बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. केआरकेने आता बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतच्या खासगी आयुष्यावर कमेंट केली आहे.

केआरकेने कंगनाविषयी एक ट्वीट केले होते. मात्र, काही वेळानंतर त्याने हे ट्वीट डिलीट केले. केआकरकेन त्याच्या ट्वीटमध्ये दावा केला की कंगना इम्रान नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोबतच त्याने लव्ह जिहादसाठी कंगनावर निशाना साधला आहे. एवढंच नाही तर केआरकेने कंगनाचे दोन फोटोही शेअर केले होते, त्यात कंगना एका पुरुषासोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत ‘ब्रेकिंग न्यूज- कंगना रणौत इम्रान नावाच्या एका इजिप्तच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ताई हे तर लव्ह जिहाद आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे. मात्र, काही वेळातच केआरकेने हे ट्वीट डिलीट केलं.

krk, kangana ranaut,
केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : ती सध्या काय करते…, जाणून घ्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या प्रेयसीबद्दल

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

दरम्यान, केआरकेने जे फोटो शेअर केले आहेत. त्या व्यक्तीसोबत कंगनाने देखील फोटो शेअर केला आहे. कंगनाने २८ जुलै रोजी हा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिच व्यक्ती दिसत आहे. मात्र, कंगनाने त्या व्यक्तीचे नाव रिझवान असल्याचे सांगितले आहे.