संपूर्ण जग सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहे. या प्राणघातक विषाणूमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोना विषाणूने विश्वयुद्धासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेता कमाल खानने दिली आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – “होय, मी लॉकडाउनमध्ये केलं शुटींग, तुम्हाला काही अडचण आहे का?”; बच्चन संतापले
“मला माहिती नाही का परंतु असं वाटतंय की लवकरच महायुद्ध होणार आहे. हे जग लवकरच नष्ट होणार आहे. धन्यवाद मित्रांनो.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.
I don’t know why? But I am feeling that #worldwar is going to happen soon. The world is going to finish. So bye friends. Love you all.
— KRK (@kamaalrkhan) May 6, 2020
कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने करोनाच्या निमित्ताने विश्वयुद्धावर कॉमेंट केली आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 2:20 pm