उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होत्या. अखेर एका फर्टिलायझर कंपनीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किम जोंग उन सर्वांसमोर आले. परिणामी या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता कमाल आर खानने प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय माध्यमांना किम जोंग उन यांच्यासोबत काय समस्या आहे? असा प्रश्न त्याने विचारला आहे.
“भारतीय माध्यमं इम्रान खान विषयी वाईट का बोलतात ते मी समजू शकतो. परंतु त्यांना किम जोंग उन यांच्यासोबत काय समस्या आहे? दर दोन महिन्यांनी त्यांना मृत घोषित केले जाते. आणि टीआरपी देण्यासाठी ते पुन्हा जिवंत होतात. आम्ही भारतीय त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.
I can understand if Indian media says bad about #ImranKhan but I simply can’t understand that what problem Indian media is having with #KimJungUn! They declare him dead Every 2nd month n #KimJungUn again becomes alive to give them TRP. And We Indians also love to know about him.
— KRK (@kamaalrkhan) May 1, 2020
कमाल खान आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने किम जोंग उन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुनचिओन येथे उभारण्यात आलेल्या एका फर्टिलायझर कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी किम जोंग उन हे उपस्थित होते, अशी माहिती कोरिअन सेंट्रल न्यूज एजन्सीनं (केसीएनए) दिली होती. सुनचिओन हे उत्तर कोरियाची राजधानी प्योगयांगच्या नजीक आहे. यादरम्यान किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान ते कंपनीचं उद्घाटन करत असतानाचे काही फोटोही समोर आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2020 6:04 pm