01 June 2020

News Flash

पाकिस्तान विमान अपघातावर बॉलिवूडचं मौन का? अभिनेत्याचा प्रश्न

पाकिस्तान विमान अपघातावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

पाकिस्तानात भीषण विमान अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लँडिंग करताना रहिवाशी भागात कोसळले. या अपघातात ९०पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दूर्दैवी घटनेवर अभिनेता कमाल खानने प्रतिक्रिया दिली आहे. या विमान अपघातावर बॉलिवूड कलाकारांनी ट्विट का केलं नाही? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

अवश्य पाहा – ‘हा तर करोनापेक्षा घातक चिनी विषाणू’; शक्तिमानची TikTok वर टीका

“एक वेळ होती जेव्हा आपले कलाकार पाकिस्तानमधील प्रत्येक घटनेवर ट्विट करायचे. परंतु आज याच कलाकारांकडे पाकिस्तानातील विमान अपघातावर बोलण्यासाठी मात्र शब्द नाहीत. इतके घाबरलात? हे कसलं आयुष्य जगताय? ब्रिटीश काळातही लोक इतके घाबरत नव्हते.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

अवश्य पाहा – काय म्हणावं चिकन तंदुरी की वडापाव?; रिहानाची तुलना खाद्य पदार्थांशी

कमाल खान सोशल मीडियावर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर कायम विविध क्षेत्रातील लोकांवर टीका करत असतो. यावेळी त्याने पाकिस्तान विमान अपघातावरुन बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:59 pm

Web Title: krk comment on pakistan plane crash mppg 94
Next Stories
1 कराची विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलचा मृत्यू
2 ‘हा तर करोनापेक्षा घातक चिनी विषाणू’; मुकेश खन्नांची TikTok वर टीका
3 …अभिनेत्यांच्या वाढलेल्या दाढीने चाहत्यांची जिंकली मने 
Just Now!
X