बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर त्याचे मत मांडताना दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. यानंतर केआरकेने अनेक कलाकारांवर टीका केली. मात्र, आता त्याच्यावर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केआरकेवर हा आरोप ताशा नावाच्या एका महिलेने केला आहे. ताशा एक लोकप्रिय फिटनेस मॉडेल आहे. केआरके विरोधात २६ जुन २०२१ रोजी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात ताशाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एवढंच नाही तर केआरकेने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा : अखेर ‘तारक मेहता..’,सोडण्याच्या चर्चांवर मुनमुन दत्ताने सोडले मौन, म्हणाली…

केआरके विरोधात २६ जुन २०२१ रोजी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

ताशा तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तर, केआरके सध्या दुबईत असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी मिका सिंगने केआरकेसाठी एक गाणं प्रदर्शित केल होतं. या गाण्यात केआरके कुत्रा आहे असं मिका सिंग म्हणाला होता. तर त्यानंतर केआरकेने मिका विरोधात एक गाणं प्रदर्शित केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk has been accused of rape by the fitness model fir register in mumbai dcp
First published on: 27-07-2021 at 12:44 IST