News Flash

‘२०२४मध्ये मोदीजी पुन्हा जिंकणार, कारण…’; कमाल खान म्हणतो…

अभिनेत्याचे हे ट्वीट चर्चेत आहे.

kamaal rashid khan, krk, kamaal r khan, nitish kumar, mamata banerjee, rahul gandhi, pm narendra modi, kamaal rashid khan says modi will win again in 2024,
त्याचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरतो..

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कमाल आर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोलही केले जाते. आता कमाल आर खानने २०२४मध्ये देशाचा पंतप्रधान कोण होणार याबाबत ट्वीट केले असून त्याचे हे ट्वीट चर्चेत आहे.

कमाल आर खानने नुकताच केलेल्या ट्वीटमध्ये २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडणूक जिंकणार असे म्हटले आहे. ‘आता ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचे आहे, राहुल गांधी यांना देखील पंतप्रधान व्हायचे आहे आणि नीतीश कुमार यांना देखील पंतप्रधान बनायचे आहे. इतरही काहींना देखील पंतप्रधान व्हायचे आहे. याचा अर्थ असा की २०२४मध्ये पुन्हा मोदीजी निवडणूक जिंकणार’ या आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : मुलीने कंडोम खरेदी करण्यात चुकीचं काय?; अभिनेत्रीचा संतप्त सवाल

केआरकेचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने ‘असं तर कुणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही. जर त्यांना भाजपाला हरवायचे असेल तर एकत्र यायला हवे. हा एकच मार्ग आहे २०२४मध्ये भाजपला हरवण्याचा’ असे म्हटले आहे.

यापूर्वी केआरकेने २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधीत एक ट्वीट केले होते. ‘कृपया सर्वांनी लक्षात घ्या मी फक्त एवढेच सांगितले की, मोदीजी पंतप्रधान झाल्यास मी भारत सोडून जाईन. शाहरुख सलमान किंवा आमिर काहीच बोलले नाहीत’ या आशयाचे ट्वीट त्याने केले होते. त्यानंतर आता त्याने २०२४मध्ये पुन्हा मोदीजी पंतप्रधान होणार असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 1:02 pm

Web Title: krk kamaal rashid khansays modi will win again in 2024 here is reason avb 95
Next Stories
1 Ram Kapoor Birthday: चाळीशीत राम कपूरने दिला होता इंटीमेट सीन; १७ मिनिटांचा लिपलॉक सीन व्हायरल
2 KBC 13: विरेंद्र सेहवागचे सौरव गांगुलीला चिमटे, धमाल उत्तरं ऐकून बिग बींना फुटलं हसू
3 मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार हे ऐकताच माधुरीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया
Just Now!
X