News Flash

“सलमान खान दोन पैशाचा माणूस…”; केआरकेचा दबंग खानवर हल्लाबोल

म्हणाला, " असा कसा तू बॉलिवूडचा मालक गुंडा भाई ?"

केआरके लागोपाठ बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर वेगवेगळ्या आरोपांनी हल्लाबोल करताना दिसून येत आहे. बॉलिवूडच्या दबंग खानचा ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यूवरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढू लागलाय. सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावा ठोकलाय. त्यानंतर केआरकेने सलमान खानवर आरोपांचे वार सुरू केले आहे. केआरकेने सलमान खानला दोन पैशाचा माणूस म्हटलंय. इतकंच नाही तर “असा कसा तू बॉलिवूडचा मालक गुंडा भाई” असं देखील त्याने सलमान खानला म्हटलंय त्यामूळे केआरकेच्या या वक्तव्यानंतर अँग्री यंग मॅन सलमान खान काय पावलं उचणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

केआरके आणि सलमान खानमध्ये सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्विटर वॉरमध्ये अजुन तरी कोणत्याच सेलिब्रिटीने उडी घेतली नाही. मात्र बिग बॉसचे काही स्पर्धक आणि टीव्ही कलाकार यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. यात ते केआरकेला विरोध देखील देताना दिसून येत आहेत. या वादात सलमान खानला कोणत्याच बॉलिवूड कलाकाराने पाठिंबा दिला नसून केवळ बिग बॉसचे स्पर्धक यात उतरवलेले पाहून केआरकेने सलमान खानला चिडवण्यासाठी एक मोठं वक्तव्य केलंय.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत हे वक्तव्य केलंय. यात त्याने लिहिलं, “आणि तु एक गोष्ट मला सांग…तू असा कसा बॉलिवूडचा मालिक गुंडा भाई आहेस…तुला सपोर्ट करण्यासाठी एकही बॉलिवूड कलाकार पुढे आला नाही…तुला स्वतःत्या सपोर्टसाठी ‘बिग बॉस’च्या चिरकूट नमुन्यांना उतरण्यासाठी सांगावं लागलं. अशी कशी इज्जत आहे तुझी यार बॉलिवूडमध्ये…??? तू खरंच बॉलिवूडमध्ये दोन पैशाचा माणूस आहेस….”

krk tweet (Photo: Twitter@KRK)

केआरकेने सलमानसाठी लिहिलं ट्विट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलंय. बॉलिवूडच्या दंबग खानचे फॅन्स सुद्धा यावर कमेंट्स करताना दिसून येत आहेत. स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल रशीद खान विरोधात मानहानीचा दाव ठोकलाय. सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची नकारार्थी समिक्षा केल्या प्रकरणी त्याने केआरकेने गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर लागोपाठ सोशल मीडियावर ट्विटर वॉर सुरू झालाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 3:10 pm

Web Title: krk kamal rashid khan called salman khan is 2 rupees person prp 93
Next Stories
1 …आणि काजोल तोंडावर पडली!, ‘कुछ कुछ होता है’च्या शूटिंगचा भन्नाट व्हिडीओ काजोलने केला शेअर
2 ‘भूतकाळ विसर कारण…’, आशुतोषने तेजश्रीसोबत शेअर केलेल्या फोटोवरुन चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण
3 “तो मोफत जेवण पुरवतोय याबद्दल कुणी का लिहित नाही”; टायगर श्रॉफच्या आईने व्यक्त केली नाराजी
Just Now!
X