News Flash

कंगना रनौतला ‘दीदी’ म्हणाला केआरके, ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ उत्तर

नेटकरी कोणत्या कारणावरून ट्रोल करतील याचा काही नेम नसतो. अगदी शुल्लक गोष्टींवरही सेलिब्रिटी ट्रोल होऊ लागले. यात केआरकेची भर पडलीय.

नेटकरी कलाकारांना कोणत्या कारणावरून ट्रोल करतील याचा काही नेम नसतो. ट्रोलर्सना तर छोटंसं कारणही पुरतं. अगदी शुल्लक गोष्टींवरही कलाकारांना ट्रोल करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. केआरके या नावाने ओळखला जाणारा कमाल आर खानने आता बॉलिवूड क्वीन कंगना रनौतशी पंगा घेतलाय. नुकतंच त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत घोषणा केली. कंगना रनौतने तिच्या पासपोर्ट रिन्यूसाठी दाखल केलेल्या याचिकेवर समिक्षा करणार असल्याचं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं होतं. पण या ट्विटमध्ये केआरकेने कंगना रनौतला ‘दीदी’ म्हटलंय. यावरून नेटकऱ्यांनी केआरकेला ट्रोल करणं सुरू केलं. त्यानंतर केआरकेनं ही त्याला जशास तसं उत्तर दिलंय.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाउंटवर घोषणा करत लिहिलं, “दीदी कंगना रनौतने तिचा पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावर माझी समिक्षा उद्या रिलीज करणार आहे.” याच दरम्यान कंगना रनौतच्या या याचिकेवर सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.

krk-reacts-on-being-trolled-for-calls-kangana-ranaut-deedi-inside1 (Photo: Twitter@kamaalrkhan)

केआरकेनं कंगना रनौतला ‘दीदी’ म्हटल्यावर तो सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतोय. त्याला ट्रोल करत असतानाच तो कंगनापेक्षा वयाने मोठा असल्याची आठवण देखील नेटकऱ्यांनी करून दिली. परंतु, केआरकेनं आणखी एक ट्विट करत ट्रोलर्सना सणसणीत चपराक लगावलीय. यात त्याने लिहिलं, “काही मुर्खांना कंगना रनौतला दीदी म्हटल्याने प्रॉब्लेम झाला आहे…दीदी याचा अर्थ बहिण असा होतो…याचा वयाशी कोणताच संबंध येत नाही…आता तरी कळलं का मुर्खांनो…?”

krk-reacts-on-being-trolled-for-calls-kangana-ranaut-deedi-inside2 (Photo: Twitter@kamaalrkhan)

अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने तिच्या याचिकेवरील सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब केली. कंगनाला तातडीनं कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाकडून नकार देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपूर्वी केआरकेनं बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानशी पंगा घेतला होता. या प्रकरणात सलमान खानने केआरकेवर मानहानीचा गुन्हा दाखल केला. सलमानला बदनाम करण्यासाठी त्याला भ्रष्टाचारी म्हणून संबोधले आणि बीइंग ह्यूमनवर फसवणूक आणि पैशाच्या घोटाळ्याचा आरोप लावला असल्याने हा मानहानी गुन्हा दाखल केल्याचं सलमानच्या वकिलांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 8:30 pm

Web Title: krk reacts on being trolled for calls kangana ranaut deedi in new post prp 93
Next Stories
1 कियारा अडवाणीला साकारायची आहे मधुबालाची भूमिका !
2 संपत्तीच्या वादातून आईचं अपहरण केल्याचा अभिनेत्रीचा आरोप; पंतप्रधानांकडे मागितली मदत
3 ‘मी एलिमिनेट होऊन एका दिवसात परतणार याची आई-बाबांना खात्री होती’, मुग्धा वैशंपायनचा खुलासा
Just Now!
X