News Flash

‘भाजपाने पोलीस, ईडी, सीबीआय यांचा वापर…’, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू केली. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग कश्यप आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. त्या दोघांसोबतच विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचं वृत्त आहे. दरम्यान अभिनेता कमाल आर खानने केलेले ट्वीट चर्चेत आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने ट्वीट करत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

कमाल आर खानने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्याने ‘भाजपा सरकारने पोलीस, ईडी, आयटी डिपार्टमेंट, सीबीआय आणि एनसीबी यांचा वापर केला आहे’ या आशयाचे ट्वीट केले आहे. त्याने या ट्वीटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला असल्याचे म्हटले जाते.

तापसी आणि अनुरागच्या मुंबईमधील मालमत्तांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या छापे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’च्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 6:18 pm

Web Title: krk tweet on bjp government avb 95
Next Stories
1 आर्यन खानचे क्लबमधील वागणे पाहून राहुल वैद्य गोंधळला, अनुभव सांगताना म्हणाला…
2 इब्राहिमचा रॉयल लूक, लग्न सोहळ्यातील नवाबी रुबाब
3 ‘वयाच्या २५व्या वर्षी मी काही कमवत नाही’, कल होना होमधील झनकचा खुलासा
Just Now!
X