27 November 2020

News Flash

‘घरी बिर्याणी असेल तर..’; पत्नीचा बोल्ड फोटो पोस्ट करत कृष्णाने केली कमेंट

फोटोसोबतच त्याने लिहिलेलं कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकने पत्नी कश्मीरा शाहचा बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटोसोबतच त्याने लिहिलेलं कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

कश्मीराने ब्लॅक लो कट मोनॉकिनीवर नुकतंच फोटोशूट केलं. त्या फोटोशूटमधील एक फोटो कृष्णाने त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला. कश्मीराच्या बोल्ड फोटोच्या कॅप्शनमध्ये कृष्णाने लिहिलं, ‘जेव्हा तुमच्या घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी का हवी असेल? तू तुझ्या ‘हॉट’ अंदाजात परतली आहेस. कश्मीरा तुझ्यावर मला खूप अभिमान आहे.’

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत कश्मीराने सांगितलं होतं की कृष्णाला तिच्या बोल्ड फोटोशूटवर आक्षेप नसतो. “माझ्या हॉट आणि बोल्ड अंदाजावरच कृष्णा फिदा झाला होता आणि पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक आकर्षण हे खूप महत्त्वाचं असतं. मी त्याच्या विनोदबुद्धीकडे आकर्षित झाले होते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करण्यावर किंवा बोल्ड फोटोशूट करण्यावर त्याचा कधीच आक्षेप नसतो”, असं तिने सांगितलं होतं.

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१३ मध्ये लास वेगासमध्ये दोघांनी गपचुप लग्न केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:01 pm

Web Title: krushna abhishek shares photo of kashmera shah says why will you want dal makhani outside ssv 92
Next Stories
1 RRR चित्रपटात हिंदूंचा अपमान?; भाजपा नेत्याने बाहुबलीच्या दिग्दर्शकाला दिली धमकी
2 बाबा का ढाबाच्या मालकाची फसवणूक? आर माधवनने ट्विट करत व्यक्त केली नाराजी
3 ‘तारक मेहता…’मध्ये इतकी सुंदर पत्नी असणारे अय्यर खऱ्या आयुष्यात सिंगल
Just Now!
X