अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी कामगिरी करणाऱ्या ‘क्षितिज: अ होरीझॉन’ या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार रोवला गेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम यादीत या चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी ऑस्कर विजेते रसूल पुकुट्टी यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Photos: ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याची क्षणचित्रे

मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला यांनी या चित्रपटाची निर्मित केली असून करिष्मा म्हाडोलकर सहनिर्माती आहेत. याआधी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाला नावाजण्यात आले. त्यामुळे दिग्दर्शक मनोज कदम यांच्या ‘क्षितिज: अ होरीझॉन’चे महत्व आणखीनच वाढले आहे. शिक्षणाचे महत्व सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा प्राध्यापक रेबन देवांगे यांनी लिहिली आहे. तसेच नीरज वोरलीया यांनी संकलित या चित्रपटाचे योगेश राजगुरू यांनी छायाचित्रण केले आहे.