‘जिसकी कुक्कू, उसकी बंबई.’ ‘हालांकि कुक्कू अपना जादू बताती नहीं क्योंकि जादू बताते ही जादू का असर खत्म हो जाता है’ हे डायलॉग आठवले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती ‘सेक्रेड गेम्स’ची कुक्कू. या वेबसिरिजमध्ये कुब्रानं एका टान्सजेंडरची भूमिका साकारली होती. कुब्राची भूमिका प्रेक्षकांवर इतकी छाप सोडणारी होती की कुब्रा खरंच ट्रान्सजेंडर आहे का ?असेही प्रश्न काहींनी तिला थेट विचारले होते.

आश्चर्य म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’नं तिला ओळख मिळवून दिली असली तरी याआधी ती सलमानसोबतही झळकली आहे. २०११ साली आलेल्या ‘रेडी’ चित्रपटात कुब्राच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती. या चित्रपटात ती सलमानच्या मोलकरणीच्या भूमिकेत होती. या चित्रपटातली कुब्रा कोणाच्याही लक्षात राहिली नसली तरी ‘सेक्रेड गेम्स’मधल्या कुक्कूनं तिला ओळख मिळवून दिली.

दुबईतली नोकरी सोडून ती बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आली होती. अर्थात इतर होतकरू तरुणांप्रमाणे तिलाही यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. मोलकरणीची भूमिका करताना पाहून अनेकांनी खिल्लीही अडवली होती. मात्र कामाचा तो अनुभव खूपच वेगळा होता असं कुब्रा ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.