News Flash

‘कुछ कुछ होता है’मधील परजान दस्तूरने बांधली लग्नगाठ; पाहा फोटो

परजान दस्तूरने बांधली प्रेयसीसोबत लग्नगाठ

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा आवर्जून समावेश केला जातो. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात एक भूमिका प्रचंड गाजली. ती भूमिका म्हणजे बालकलाकार परजान दस्तूर याची. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रिय झालेला हा चिमुकला आता मोठा झाला असून नुकतीच त्याने लग्नगाठ बांधली आहे.

परजानने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेयसी डेलना श्रॉफ हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परजानने पारंपरिक पारसी रितीरिवाजासह डेलनासोबत लग्न केलं आहे.

(फोटो सौजन्य : परजान दस्तूर इन्स्टाग्राम स्टोरी)

 

२०२० मध्ये परजानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नव्या वर्षात लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर परजान व डेलनाने लग्न केलं आहे.

वाचा : स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडने बांधली प्रेयसीसोबत लग्नगाठ; पाहा फोटो

दरम्यान, परजानने ‘कुछ कुछ होता हैं’ व्यतिरिक्त ‘मोहब्बतें’, ‘परजानियाँ’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिकंदर या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 11:42 am

Web Title: kuch kuch hota hai little sardar parzaan dastur got married to delna shroff ssj 93
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स ३’ बाबत नवाजुद्दीनचा मोठा खुलासा, म्हणाला…
2 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत मनोरंजनातून प्रबोधन
3 आली समीप लग्नघटिका.. अभिज्ञा भावेच्या हातावर रंगली मेहंदी
Just Now!
X