08 March 2021

News Flash

काही खात का नाहीस? टायगर श्रॉफच्या फोटोवर अनुपम खेर यांची भन्नाट कमेंट

टायगर श्रॉफच्या फोटोवर अनुपम खेर यांची भन्नाट कमेंट; वाचून पोट धरून हसाल

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या चित्रपटांसोबतच फिटनेसमुळेदेखील अनेक वेळा चर्चित असतो. बऱ्याच वेळा टायगर सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊट आणि फिटनेसचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यात त्याचे सिक्सपॅक अॅब्ज दिसून येत आहेत. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी भन्नाट कमेंट केली असून सध्या सोशल मीडियावर या फोटोची आणि अनुपम खेर यांच्या कमेंटची चर्चा रंगली आहे.

टायगरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो शर्टलेस असून त्याचे सिक्सपॅक अॅब्ज दिसत आहेत. या फोटोला त्याने, “जेव्हा दाढी येत नव्हती..#बालिशपणा”, असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Jab daadi nahi aati thi… #bachpana

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

हा फोटो पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे ते अनुपम खेर यांच्या कमेंटमुळे. “हाडं दिसू लागली आहेत, काही खात का नाहीस?”, अशी कमेंट अनुपम खेर यांनी केली आहे.

दरम्यान,सध्या सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा आहे. आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि १० हजारपेक्षा अधिक कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. सध्या लॉकडाउन असल्यामुळे टायगर घराबाहेर वावरताना दिसत नाही. मात्र तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:41 pm

Web Title: kuchh khate kyun nahi anupam khers reaction to tiger shroffs pic ssj 93
टॅग : Anupam Kher
Next Stories
1 “तुझं ऐकून आम्ही पानमसाला खातोय”; Immunity Booster च्या जाहिरातीवरुन अजय देवगण ट्रोल
2 पुन्हा ‘शनाया’ची भूमिका साकारण्याबद्दल रसिका म्हणते…
3 कधीकाळी ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू कपूर लिहायच्या प्रेमपत्र?
Just Now!
X