News Flash

‘जितकी जास्त चर्चा तितका जास्त TRP’; ‘इंडियन आयडल’च्या वादात कुमार सानूंची उडी

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो 'इंडियन आयडल १२' चर्चेत आहे.

इंडियन आयडल १२वर कुमार सानू यांनी वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ चर्चेत आहे. सोशल मीडियावर यूजर्स कधी शोमधील परीक्षकांवर निशाणा साधतात तर कधी स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून संताप व्यक्त करतात. आता यावर ९०च्या दशकातील बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय प्लेबॅक सिंगर कुमार सानू यांनी वक्तव्य केले आहे.

कुमार सानू यांनी नुकताच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांवर मत मांडले. दरम्यान त्यांना इंडियन आयडल हा सिंगिंग रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. तुम्हाला असे वाटते का या शोमध्ये टॅलेंटला प्रोत्साहन दिले जाते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत कुमार सानू यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा : ‘हा ड्रामा आता बंद करा, रिअ‍ॅलिटी शोला डेली सोप बनवलं’, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

‘जितकी जास्त चर्चा होणारा, तितका जास्त TRP वाढणार हे लक्षात घ्या. ही मोठी गोष्ट नाही. टॅलेंट असेल तर योग्य मार्ग मिळतोच आणि या शोच्या माध्यमातून अनेक टॅलेंटेड गायक इंडस्ट्रीला मिळाले आहेत. इंडियन आयडलच नाही तर सर्वच शो असे असतात. स्पर्धकांना स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. असे होऊ शकते की त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. पण या मंचामुळे त्यांना काही काम मिळाले आणि पैसा कमावण्याची संधी मिळू शकते’ असे कुमार सानू म्हणाले.

काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल १२ या शोमध्ये फादर्स डे स्पेशल एपिसोड साजरा करण्यात आला. या भागात स्पर्धकांनी आपल्या वडिलांसाठी गाणी गायिली होती. दरम्यान स्पर्धक, त्यांचे कुटुंबीय आणि परीक्षक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त् पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला होता. हा शो डेली सोप झाला आहे असे अनेकांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 8:34 am

Web Title: kumar sanu open up on reality shows indian idol said more gossip gets higher trp avb 95
Next Stories
1 FRIENDS चे ‘गंथर’ जेम्‍स मायकल टायलर यांना चौथ्या स्टेजचा कॅंसर; हाडांपर्यंत पसरला आजार
2 ‘यामुळे’ एका वर्षात प्रभासने तब्बल १५० कोटी रुपयांच्या जाहिराती नाकारल्या!
3 कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी ‘नट्टू काकां’नी घेतला मालिकेतून ब्रेक
Just Now!
X