News Flash

टॉवेलवर डान्स करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात

मूळ गाण्यात राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा यांनी टॉवेलमध्ये डान्स केला होता

टॉवेलवर डान्स करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे कोणती व्यक्ती कधी प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचाच वापर करतात. सध्या छोट्या पडद्याची प्रसिद्ध नायिका श्रद्धा आर्या तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती आणि तिच्या दोन मैत्रिणी ‘हर दिल जो प्यार करेगा’ या सिनेमातील ‘पिया… पिया…’ गाण्यावर डान्स करत आहेत. मूळ गाण्यात राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा यांनी टॉवेलमध्ये डान्स केला होता. त्यांच्याप्रमाणेच श्रद्धा आर्या आणि तिच्या मैत्रिणींनीही टॉवेलमध्ये हा डान्स केला. डान्स करताना आर्याच्या एका मैत्रिणीचा हात तिच्या नाकाला जोरात लागल्याने तिला दुखापत झाली. श्रद्धाने हा व्हिडिओ तसाच शेअर केला. हा व्हिडिओ काही तासांत ३ लाखांहून अधिल लोकांनी पाहिला. श्रद्धाने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

सध्या ती कुंडली भाग्य मालिकेत प्रीती अरोडाची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिने ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. मालिकांसोबत तिने पाठशाला आणि निशब्द या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 4:02 am

Web Title: kumkum bhagya actress shraddha arya towel dance viral
Next Stories
1 नाटक बिटक : ब्रॉडवेवरचा भव्यदिव्य ‘अलाद्दिन’ भारतीय रंगभूमीवर!
2 पुलकित सम्राट आणि यामी गौतमचं ब्रेकअप?
3 ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाला मिळाले अंतिम पाच शिलेदार!
Just Now!
X