News Flash

कुणाल कामरा आणि त्याचे आई वडील करोनाबाधित

कुणाल गृहविलगीकरणात तर त्याचे आईवडील दवाखान्यात उपचार घेत आहेत.

देशात सध्या करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. छोट्या पडद्यावरचेही अनेक कलाकार करोनाबाधित झाले आहेत. नुकतीच अशी माहिती मिळाली आहे की, स्टँडअप कॉमेडिय़न कुणाल कामरा आणि त्याच्या परिवारालाही करोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

कुणाल आणि त्याचे आई वडील अशा तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. ३२ वर्षीय कुणाल सध्या गृहविलगीकरणात आहे. तर त्याचे आई वडील घराजवळच्याच दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. तो म्हणतो, माझे आई वडील करोना पॉझिटिव्ह आहेत आणि ते जवळच्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. मीही करोनाबाधित आहे आणि घरीच क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांशी मी बोललो आहे. मी आणि माझा परिवार लवकरच यातून बरे होऊ.

त्याने सर्वांना करोनाची दुसरी लाट गांभिर्याने घेण्याचे आणि भरपूर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
कुणालसोबतच अनेक गेल्या आठवड्यापासून अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, विकी कौशल, भूमी पेडणेकर, आलिया भट हे त्यापैकीच काही. भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.

दिवसेंदिवस भारतातले करोनाचे रुग्ण वाढच आहेत. रुग्णसंख्या ९०,००० च्या वर जाण्याचा आजचा सलग तिसरा दिवस आहे.
सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासात ९६,९८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही करोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्याच अनुषंगाने प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद असे अनेक निर्बंध करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 3:33 pm

Web Title: kunal kamra and his parents tested positive vsk 98
Next Stories
1 दिवंगत अभिनेत्री शशिकला यांच्या आठवणीत अभिनेते धर्मेंद्र भावूक
2 दिया मिर्झाने साजरा केला सावत्र मुलीचा वाढदिवस, व्हिडीओ व्हायरल
3 अर्जुनचं ‘फरक ओळखा’ चॅलेंज जान्हवीने जिंकलं!
Just Now!
X