News Flash

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘लूटकेस’, पण या कारणामुळे कुणाल खेमू नाराज

त्याने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या संपूर्ण देशात करोना व्हारसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, कुणाल खेमू, विद्युत जामवाला यांचे चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत. ही घोषणा करण्यासाठी अक्षय, अजय, आलिया, अभिषेक डिझनी हॉटस्टावर लाइव्ह आले होते. पण या यादीमध्ये कुणाल खेमू आणि विद्युत जामवालाचे नाव नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुणाल खेमूचा लूटकेस आणि विद्युत जामवालाचा खुदा हाफिस हे चित्रपट लवकरच हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटांच्या घोषणा करण्यासाठी कुणाल खेमू आणि विद्युत जामवालाला इनवाइट पाठवले नसल्यामुळे त्यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

‘इज्जत आणि प्रेम हे मागून मिळत नसते तर ते कमवावे लागते अशा अशयाचे ट्विट करत कुणाल खेमूने नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच विद्युतने, ‘खरच ही खूप मोठी घोषणा आहे. सात चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. पण दोन चित्रपटांना आमंत्रणच देण्यात आले नाही’ असे विद्युतने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लवकरच हॉटस्टारवर लक्ष्मी बॉम्ब, दिल बेचारा, बिग बूल, सडक – २, भूज, खुदा हाफिज, लूटकेस हे चित्रपट प्रेक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:15 pm

Web Title: kunal kemmu angry disneyhotstar over invitation ignorance lootcase avb 95
Next Stories
1 ‘सडक २’चे पोस्ट प्रदर्शित होताच महेश भट्ट झाले ट्रोल
2 “त्यांनी आंम्हाला विचारलं सुद्धा नाही”; हॉटस्टारच्या कॉन्फरन्सवर अभिनेत्री नाराज
3 ‘शुभारंभाचा प्रयोग’? स्पृहाने शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नाट्यरसिक संभ्रमात
Just Now!
X