News Flash

‘अशा’ अवतारात कुणाल खेमू पहिल्यांदा सोहा अली खानच्या आईला भेटला

Birthday Special:

(photo-intagram@kunalkemmu)

अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी समजली जाते. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे अनेक व्हिडीओ ते शेअर करत असतात. आज अभिनेता कुणाल खेमूचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कुणालला सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कुणाल आणि सोहाची लव्हस्टोरी देखील खास आहे. २०१५ सालामध्ये कुणाल आणि सोहाने लग्नगाठ बांधली. सोहाने कुणाल आणि तिच्या नात्याबद्दल पहिल्यांदा आईला सांगितलं होतं. आई शर्मिला टागोर यांच्या मदतीनेच तिने वडिलांना तिच्या आणि कुणालच्या नात्याबद्दल कल्पना दिली. कुणाल खेमू आणि सोहाची आई म्हणजेच अभिनेत्री शर्मिला टागोर यांची भेटही अगदी हटके होती.

हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सोहा अली खानने कुणाल खेमू आणि शर्मिला टागोर यांच्या पहिल्या भेटीचा धमाल किस्सा सांगितला होता. जेव्हा कुणाल सोहाची आई शर्मिला टागोर यांना भेटला होता तेव्हा त्याने एक पांढऱ्या रंगाचं बाथरोब आणि शार्टस् परिधान केली होती. एका सेटवर त्यांची भेट झाली होती. यावेळी कुणाल खेमूने त्या शूटसाठी तसे बाथरोब परिधान केला असल्याचं सोहाने मुलाखतीत सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

सोहाने कुणाल आणि तिच्यात आसलेल्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा आईची मनधरणी केली असल्याचं या मुलाखतीत सांगितलं होतं. आपल्याला उत्तम जेवण बनवता येत असून, अनेकदा आपणच सोहासाठी जेवण बनवत असल्याचं कुणालने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. सोहा अली खानला स्वयंपाकातलं काहीच कळत नव्हतं. जेव्हा सोहाने पहिल्यांदा कुणालसाठी स्वयंपाक केला होता, तेव्हा तो सर्व स्वयंपाक जळला होता. असं असतानादेखील कुणालने विनातक्रार जेवण करून, सोहाचं कौतुकदेखील केलं होतं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कुणाल आणि सोहाने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 10:36 am

Web Title: kunal khemmu birthday special when he firts time met soha ali khan mother shrmila tagore kpw 89
Next Stories
1 आदित्य नारायणने अलिबागकरांची मागितली माफी; म्हणाला “अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम”
2 ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता करण जोहर; तिच्या सांगण्यावरून टेकडीवरून मारली होती उडी
3 Video: शिल्पा शेट्टीने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X