भर उन्हाळ्यात मुंबईत धडकलेल्या तौते चक्रीवादळामुळे दोन दिवसांसाठी मुंबईसंह आसपासच्या भागातील वातावरण चांगलचं बदललेलं पाहायला मिळालं. या वादळामुळे काही ठिकाणी नुकसान झालं असलं तरी तुफान वारा आणि काळ्या ढगांची गर्दी यामुळे कमी झालेली उन्हाची दाहकता असं हे वातावरण अनेक जणांची चांगलच एन्जॉय केलंय. अभिनेता कुणाल खेमूने देखील या वातावरणाची मजा लुटली आहे.

घराच्या बाल्कनीवर गार वाऱ्याचा आनंद घेत असताना अभिनेता कुणाल खेमूला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्याने केलेली धमाल पत्नी सोहा अली खानने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ सोहाने इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर कुणालनेही तो रिपोस्ट केलाय. या व्हिडीओला कुणालने खास कॅप्शन दिलंय. “जेव्हा माझ्यातील अनिल कपूर फॅन बाहेर पडतो.” असं या धमाल डान्स व्हिडीओला त्याने कॅप्शन दिलंय.

या व्हिडीओच्या सुरुवातीला सोहाचा आवाज ऐकू येतोय. यात ती छतावर येऊन वादळानंतर झाडांची कशी पडझड झालीय हे सांगतेय. एवढ्यात कुणाल एण्ट्री करतो. यात तो अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितचा सुपरहिट सिनेमा ‘तेजाब’ मधील ‘केह दो की तुम हो मेरे वरना’ हे लोकप्रिय गाण स्वत: गात त्यावर अनिल कपूर यांच्या स्टेप्स करताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

काही तासांतच कुणाल खेमूचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. अनेक चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओला मोठी पसंती दिलीय. लॉकडाउनच्या काळात कुणाल पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवताना दिसतोय. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतो.