News Flash

… म्हणून कुशल बद्रिकेने केलं वैभव मांगलेंचं कौतुक

'...तेव्हा जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास ठाम होत जातो. '

उत्तम अभिनयाबरोबरच शास्त्रीय संगीताचा अभ्यास, गाण्याची आवड आणि चित्रकारिता या तिन्ही गोष्टी वैभव मांगले यांनी मनापासून जपल्या आहेत. विशेषकरून लॉकडाउनदरम्यान त्यांचा जीव चित्र काढण्यात रमत गेला आणि घरातील विविध जुन्या वस्तूंवर त्यांनी अप्रतिम कलाकृती साकारली. वैभव मांगले यांनी केवळ छंद म्हणून ती चित्रे काढली नसून, त्यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा रंगमंच कामगार जे सध्या काम नसल्याने अडचणीत आहेत, त्यांना आर्थिक मदत स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कामाचं विनोदवीर कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित कौतुक केलं आहे.

‘एखाद्या उत्तम कलाकारापेक्षा त्याच्यातला माणूस जेव्हा मोठा होतो ना, तेव्हा जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास ठाम होत जातो. आपल्या विनोदी व्यक्तिरेखांमधून लोकांना हसवणारा, काही भूमिकांमुळे व्हिलन वाटणारा आणि थोडंसं स्पष्ट बोलल्यामुळे बदनाम असणारा, आमचा मित्र वैभव मांगले, हे त्यातलंच एक उदाहरण’, अशा शब्दांत कुशल बद्रिकेने कौतुक केलं.

वैभव मांगले यांनी आतापर्यंत काही चित्रं विकली असून, त्यातून ७० हजार रुपयांची रक्कम उभी राहिली आहे. या रकमेतून त्यांनी आतापर्यंत बारा गरजू रंगकर्मींना मदत देऊ केली आहे. यापुढेही आणखी रक्कम गोळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 5:13 pm

Web Title: kushal badrike lauds actor vaibhav mangle for financially helping theatre artists ssv 92
Next Stories
1 एकता कपूरच्या घरावर दगडफेक; वेब सीरिजमधील त्या सीनमुळे प्रेक्षक संतापले
2 कंगनाच्या ‘बाबर सेना’ला संजय राऊतांचं उत्तर; बाबरी पाडणारे आम्हीच आहोत
3 बाईकच्या क्रेझने देवदत्त नागेला मिळाला अनोखा टॅटू
Just Now!
X