21 January 2018

News Flash

PHOTO : तुम्हाला हसवणाऱ्या कलाकारांची घरी काय अवस्था असते बघा

अरे संसार संसार...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 8:51 AM

कुशल बद्रिकेने फेसबुकवर पोस्ट केले फोटो

‘काय मंडळी हसताय ना… हसायलाच पाहिजे’ म्हणत ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीरांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला भाग पाडले. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. मात्र तुम्हाला हसवणाऱ्या या कलाकारांची घरी काय अवस्था असते, हे दाखवणारे काही गमतीशीर फोटो अभिनेता कुशल बद्रिके याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

कुशलने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे हे फरशी पुसताना, झाडू मारताना आणि भांडी घासताना पाहायला मिळताहेत. तर चौथ्या फोटोमध्ये श्रेया बुगडे चहाचा आस्वाद घेत बसलेली पाहायला मिळते. ‘अरे संसार संसार… झाडू, लादी, भांडी कर… तुला दिली रे देवाने… एक बायको डोक्यावर,’ अशी चारोळी कुशलने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

वाचा : आमिर खान आत्मचरित्र लिहिणार, पण एका अटीवर…

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या हास्यविनोदी कार्यक्रमाने केवळ मराठी मनातच नव्हे तर इतर भाषिक चित्रपट रसिकांच्या मनातदेखील स्थान मिळवले आहे. मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, सोनम कपूर इत्यादी नामवंत मंडळींनीही त्यांच्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर उपस्थिती लावली. या शोमधील हास्यफवाऱ्यांनी दर्शकांबरोबरच चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आलेले कलाकारदेखील उपस्थितांसोबत हसून हसून लोटपोट होतात.

First Published on October 4, 2017 8:51 am

Web Title: kushal badrike shared photos of chala hawa yeu dya artists while doing daily chores at home
  1. raj Dahale
    Oct 4, 2017 at 9:38 am
    काहीपण
    Reply