23 November 2017

News Flash

‘बेहद’च्या सेटवर लागली आग, अर्जुनने वाचवला अंजारीचा जीव

आग कुशलच्या लक्षात आली नसती तर तिने रौद्र रुप धारण केले असते

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 4:09 PM

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून बेहद मालिकेकडे पाहिले जाते. बेहदच्या सेटवर लग्नाचे दृश्य चित्रीत केले जात होते. मालिकेतील दृश्य अधिकाधिक वास्तवदर्शी दाखवण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. मालिकांच्या कथानकाच्या अनुशंगाने शक्य त्या सर्व गोष्टींची तयारी केली जाते. चित्रीकरणामध्ये योग्य ती सुरक्षितता घेऊनही कधीतरी अघटीत घडून जाते. बेहद मालिकेच्या बाबतीत तर हे दोनदा झाले.

विद्या बालन म्हणते, ‘हॅलो… मैं सुलु बोल रही हूँ!’

पहिल्यांदा अर्जुन (कुशल टंडन) आणि माया (जेनिफर विंगेट) यांच्या लग्नाचे दृश्य चित्रीत करताना संपूर्ण मंडपाला आग लागली होती. या मंडपात तेव्हा कुशल आणि जेनिफर दोघेच उभे होते. यावेळी कुशलने प्रसंगावधान राखून जेनिफरला त्या आगीतून वाचवले होते. ही घटना ताजी असताना आता दुसऱ्यांदा या मालिकेच्या सेटला आग लागली.

सेटवरील एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, ‘अर्जुन आणि सांझ (अनेरी वजानी) यांच्या लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण होत असताना सेटला आग लागली. पण कुशलने जर योग्य वेळी प्रसंगावधान दाखवले नसते तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या. लग्नातील एका दृश्याचे चित्रीकरण होत असताना अनेरीच्या पदराला आग लागल्याचे कुशलने पाहिले. त्याने पदराची आग वाढत जाऊ नये म्हणून पटकन पदराचा तो भाग फाडून टाकला.’

And its a Wrap to our crazy Mauritius schedule ! Twining wid My Favourite!❤️ #Beyhadh #MeraDuffer #BeachLove #

A post shared by Aneri Vajani (@vajanianeri) on

Wen my co actor burns his hand to savee meeeeee! Awwwwww😬 PS:He is still smiling ! Get well soon Tandon ! 😀

A post shared by Aneri Vajani (@vajanianeri) on

ही आग कुशलच्या लक्षात आली नसती तर तिने रौद्र रुप धारण केले असते. या घटनेमुळे अनेरी स्वतः फार घाबरली होती. पण थोड्यावेळाने सेटवरचे वातावरण शांत झाल्यावर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. सेटवरचे वातावरण थोडे खेळीमेळीचे करण्यासाठी, ‘माझा मंडपाला आग लावण्यात काहीही हात नाही,’ असे कुशल सगळ्यांना सांगत होता. जेनिफर आणि अनेरी या दोघींचे प्राण वाचवणारा कुशल खरा हिरो असल्याचे त्याने सिद्ध केले. याआधीही कुशलने अनेरीवर गरम चहा पडण्यापासून वाचवले होते यात त्याचा हात भाजला होता.

First Published on September 14, 2017 4:09 pm

Web Title: kushal tandon saves beyhadh co star aneri vajani from fire