हिंदी चित्रपट जगतात विनोदी भयपट अपवादाने निर्माण होतात. मात्र आता हेच आव्हान ‘कुत्ते कि दुम’ या नव्या चित्रपटाने पेलले आहे. हा नवा विनोदी भयपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सावनकुमार टाक यांनी हे अनावरण केले आहे. या चित्रपटाचे लेखक -दिग्दर्शक सुनील पटेल असून ते या चित्रपटाचे केवळ दिग्दर्शकच नाहीत तर लेखक आणि संगीतकार सुद्धा आहेत.

निर्माती सोनिका पटेल, सहनिर्माती शुभ चांदनी पटेल, सादरकर्ते सत्येन्द्र त्रिपाठी यांच्या या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याप्रसंगी चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर मान्यवरांना दाखवण्यात आली. या चित्रपटात तान्या दांग, जस बोपाराय, ललित सिंह राव, राज़ रहमान अली आणि सन्नी मुख्य भूमिकेत आहे. सावनकुमार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी योगेश लखानीही उपस्थित होते. जो सतत चुका करतो त्याची गोष्ट सांगणारा हा इंडियन करीफिल्म्सचा ‘कुत्ते कि दुम’ येत्या २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट