News Flash

‘…तर त्यातून बाहेर पडणेच योग्य’, घटस्फोटावर मिनिषा लांबाचा खुलासा

मिनिषाने रयान थाम यांच्याशी लग्न केले होते.

सध्या ती 'कुतुब मीनार' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

‘यहां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे मिनिषा लांबा. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘कुतुब मीनार’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सीरिजच्या प्रमोशनसाठी मिनिषाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या घटस्फोटाविषयी सांगितले आहे.

मिनिषाने नुकतीच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वेब सीरिजचे चित्रीकरण करतानाचा अनुभव, घटस्फोट अशा अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे. मिनिषाने रयान थाम यांच्याशी लग्न केले होते. पण पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना मिनिषा म्हणाली, ‘प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार आहे. पहिले आपल्या समाजात घटस्फोटाकडे चुकीच्या नजरेने पाहिले जायचे. प्रत्येक वेळी महिलांनीच त्याग करण्याचा ठेका घेतला होता. परंतु आता महिलांना समजले आहे की जर ती तिच्या संसारात आनंदी नसेल तर तिला त्या नात्यातून बाहेर पडण्याचा देखील अधिकार आहे’ असे मिनिषा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Minissha (@minissha_lamba)

आणखी वाचा : अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचे निधन

पुढे ती म्हणाली, ‘घटस्फोट घेणे सोपे नसते. पण रिलेशनशीप जर तुम्हाला नको असेल तर त्यातून बाहेर पडणेच योग्य आहे. तुमचे लग्न किंवा रिलेशनशीप तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. दुर्दैवाने आधीच्या काळात महिला या त्यांचे रिलेशनशीप किंवा वैवाहिक स्थिती यामुळे ओळखल्या जात होत्या. परंतु आता काळ बदलत आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 11:33 am

Web Title: kutubminar actress minissha lamba opens up on divorce with ryan tham avb 95
Next Stories
1 राखीला किस ते दुबईमध्ये जेलची हवा, जाणून घ्या मिका सिंगच्या कॉन्ट्रोव्हर्सी
2 ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभी इतकीच सुंदर आहे मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी!
3 रिचा चढ्ढाच्या सडेतोड उत्तरानंतर नेटकऱ्याने अभिनेत्रीला केलं ब्लॉक
Just Now!
X