News Flash

“कसलं बकवास गाणं आहे”; अभिनेत्याने केलं शहनाजच्या ‘कुर्ता पजामा’ गाण्यावर ट्विट

शेहनाज गिलचं 'कुर्ता पजामा' हे गाणं सर्वत्र चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री शेहनाज गिलचं ‘कुर्ता पजामा’ हे गाणं सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या गाण्याच्या व्हिडीओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुन या गाण्याचं क्रेझ आपल्या लक्षात येते. परंतु अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने मात्र या गण्यावर चकित करणारी कॉमेंट केली आहे. “काला काला काला हे कसंल बकवास गाणं आहे” असं ट्विट त्याने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – १२वीत कमी मार्क मिळाल्यामुळे अभिनेत्री नाराज; ‘या’ कारणामुळे झाला नव्हता अभ्यास

अवश्य पाहा – खरा सुपरहिरो! ‘या’ सहा वर्षांच्या मुलाला मार्व्हलने दिली ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड

खरं तर सिद्धार्थने या गाण्यावर टीका केलेले नाही. मात्र त्याने अनोख्या शैलीत गाण्याची स्तुती केली आहे. “कुर्ता पाजामा काला काला काला काला काला काला हे कसंल बकवास गाणं आहे. ऐकल्यापासून तोंडातून जातंच नाही.” अशा आशयाचं ट्विट सिद्धार्थने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टोनी कक्कर याने ‘कुर्ता पजामा’ या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं त्यानेच गायलं आहे. दोन दिवसांपूर्वी हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं. या गाण्यात शेहनाज गिलने जबरदस्त नृत्य सादर केलं आहे. काही तासांत या व्हिडीओला एक कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 4:49 pm

Web Title: kya bakwas gana hai sidharth shukla on kurta pajama song mppg 94
Next Stories
1 हार्दिक-नताशाचा हटके ‘फॅमिली’ फोटो पाहिलात का?
2 रणबीर कपूरच्या डुप्लीकेटचं निधन; ऋषी कपूर देखील होते त्याच्या लूकचे फॅन
3 Success Story : बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचलेल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत
Just Now!
X