नव्याने रुजू होणाऱ्या ‘क्या कसूर है अमला का’ मालिकेचे प्रदर्शन

दुपारच्या वेळीही प्रेक्षकांना मालिकांचे पुन:प्रक्षेपण दाखवण्यापेक्षा नविन आशयाच्या मालिका आणत नवा प्रयोग करणाऱ्या ‘स्टार प्लस’ वाहिनीने या नव्या स्लॉटमधील नव्या मालिकेचे प्रदर्शन थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘कॅन’ शहरात करण्यात आले. जगभरातील चित्रपट आणि तारे-तारकांना ‘रेड कार्पेट’वर एकत्र आणत त्यांच्यातील सवरेत्कृष्ट असलेल्यांचा गौरव करणारे शहर म्हणून फ्रान्समधील ‘कॅ न’ची ओळख आहे. याच शहरात रंगलेल्या ‘इच्चो राईट्स मिप टीव्ही’ या कार्यक्रमात ‘क्या कसूर है अमला का’ या नव्याने रुजू होणाऱ्या मालिकेचे प्रदर्शन करण्यात आले.

‘स्टार प्लस’ने दुपारच्या स्लॉटमध्ये पाच नव्या मालिका सुरू केल्या असून यात ‘फातमागुल’ या गाजलेल्या तुर्की मालिके चा भारतीय अवतार ‘क्या कसूर है अमला का’ या नावाने दाखवण्यात येणार आहे. ‘इच्चो राईट्स मिप टीव्ही’ या कॅनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात आपल्या मालिका सादर व्हाव्यात यासाठी जगभरातील निर्माते आपल्या मालिकांची नोंद करतात. यावेळी मालिकेतील कलाकारांचा उत्तम अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये आणि दर्जेदार कामगिरी यांच्या बळावर ‘क्या कसूर है अमला का’ या मालिकेची निवड झाली. आणि ही मालिका त्या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली, अशी माहिती मालिकेच्या निर्मात्यांनी दिली.

‘जगभरातून आलेल्या कार्यक्रम आणि मालिकांमधून ‘इच्चो राईट्स मिप टीव्ही’च्या प्रतिष्ठित व्यासपीठावर या मालिकेचे प्रसारण करण्याची संधी आम्हाला मिळाली. हा आम्ही आमचा गौरव समजतो’, अशा शब्दांत मालिकेच्या निर्मात्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

संघर्षांची कथा

‘क्या कसूर है अमला का’ ही मालिका एका तरूणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतरचा तिचा संघर्ष, प्रवास यावर आधारित आहे. मूळ ‘फातमागूल’ ही तुर्की मालिकाही प्रचंड गाजली होती. त्यामुळे त्याच्यावर आधारित असलेल्या या हिंदी मालिकेलाही लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे. त्यातच ‘कॅ न’सारख्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातील लोकांपर्यंत ही मालिका आधीच पोहोचल्यामुळे त्याचाही फायदा मालिकेला होईल, असे निर्मात्यांना वाटते.