News Flash

तुषार आणि अाफताब झाले पोर्न स्टार!, ‘क्या कूल है हम ३’चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाचा ट्रेलर हा दुहेरी अर्थाच्या संवादांनी विनोदी शैलीने धम्माल उडवून देणारा आहे.

'क्या कूल है हम-३' चा पोस्टर

बॉण्डपट ‘स्पेक्टर’मधील चुंबनदृश्याला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्यावरून वाद-विवाद झाले. सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर टीका झाली. तसेच चित्रपटातील दृश्य स्वातंत्र्याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त करण्यास सुरूवात केली. पण निर्माती एकता कपूर मात्र सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेने अजिबात चिंताग्रस्त दिसत नाही. कारण, तिचा आगामी ‘क्या कूल है हम ३’ हा चित्रपट प्रौढ विनोदांच्या बॉलीवूड चित्रपटांच्या आतापर्यंतच्या सर्व सीमा ओलांडण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘क्या कूल है हम ३’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चित्रपटात अभिनेता तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि अभिनेत्री मंदना करमिनी यांना चक्क पोर्नस्टार दाखविण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर दुहेरी अर्थाच्या संवादांनी विनोदी शैलीने धम्माल उडवणारा आहे. तुषार, आफताब चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून, अभिनेत्री क्लाऊडिया सिस्ला, बिग बॉस फेम गिझेल ठकराल यांचा हॉट अंदाज पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरमध्ये तुषार सलमानच्या ‘किक’ चित्रपटातील ‘डेव्हील’ची तर गिझेल ही विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटातील भूमिकांची विनोद पद्धतीने नक्कल करताना दिसतात. दरम्यान, या चित्रपटाचा प्रौढ विनोदाचा बाज पाहता आता सेन्सॉर बोर्ड चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 4:05 pm

Web Title: kyaa kool hai hum 3 trailer tusshar kapoor aftab shivdasani turn porn stars
Next Stories
1 आलियाला किरकोळ दुखापत, सलमानने घेतली भेट
2 पुढच्या दोन वर्षांत गाजलेल्या हॉलिवूड सिक्वलपटांचा पाऊस
3 सारा तेंडुलकर आणि जस्टिन बीबरचे छायाचित्र व्हायरल
Just Now!
X