27 September 2020

News Flash

अवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा

हा इतिहासातील सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तिचा पुतळा आहे

हॉलिवूड टि.व्ही. स्टार काइली जेनर

‘लाइफ ऑफ काइली’, ‘किपिंग अप विथ द कदार्शिअन’ या मालिकांमधील अभिनय व ट्विटर आणि इन्टाग्रामवरील मादक छायाचित्रांमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हॉलीवूड टीव्ही स्टार काइली जेनरला तिच्या २०व्या वाढदिवसाला मिळालेल्या भेटीमुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मादाम तुसाँ संग्रहालयाने कायलीला तिच्या मेणाचा पुतळा वाढदिवस भेट म्हणून दिला. यामुळे या संग्रहालयाच्या इतिहासात सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तीचा पुतळा बसवण्याचा नवा विक्रम कायलीच्या नावावर नोंदला गेला आहे. काइलीने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या दिवशी त्या मेणाच्या प्रतिकृतीचे अनावरण केले. तो पुतळा दिसायला इतका हुबेहुब होता की तेथील उपस्थित व्यक्तींनी आपली बोटे अक्षरश: तोंडात घातली. या अनोख्या भेटीबद्दल जेनरने आनंद व्यक्त केला. तिला तो पुतळा म्हणजे जणू तिची जुळी बहीणच वाटत होती. तिच्या मते आजवर आरशात स्वत:ला जितके निरखून पाहिले नसेल तितक्या वेळा तिने ती प्रतिकृती निरखून पाहिली. त्या हुबेहूब कलाकृतीबरोबर तिने छायाचित्रे काढून आपल्या चाहत्यांसाठीही लगेच इंटरनेटवर अपलोड केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 12:05 am

Web Title: kylie jenner madame tussauds wax statue hollywood katta part 27
टॅग Hollywood Katta
Next Stories
1 पूजा भट्ट करणार आलियाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन?
2 ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेच्या भूमिकेत तापसी
3 Bhoomi Poster : रक्ताने माखलेला संजय दत्त
Just Now!
X