News Flash

“शेवटची अंघोळ कधी केली आठवत नाही”, अभिनेत्रीचा अजब दावा

तिने शेवटची अंघोळ कधी केली होती. हे देखील तिला आठवत नाही

सर्वत्र सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. या थंडीच्या दिवसांमध्ये एक गोष्ट जी अनेकांना आवडत नाही, ती म्हणजे अंघोळ करणे. खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला अंथरूणाबाहेर येण्याची इच्छाच नसते. मग अशा अवस्थेत कोण एवढ्या थंडीत अंघोळ करणार…? परंतु असा आळशीपणा फत्त सर्वसामान्य लोक करतात असे नाही. अनेक नामांकित सेलिब्रिटीही असेच वागतात. जगप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागा याचे एक ताजे उदाहरण आहे. लेडी गागाला दररोज अंघोळ करणे आवडत नाही. तिने शेवटची अंघोळ कधी केली होती. हे देखील तिला आठवत नाही असे ती म्हणाली.

‘या’ अभिनेत्रीच्या आईनेच केली वडिलांची हत्या

ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या नामांकित पुरस्कारांवर नाव कोरणारी लेडी गागा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. संगीताबरोबरच गेल्या काही काळात तिने अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीतही नाव कमावले. परंतु सध्या ती कुठलाही आगामी चित्रपट किंवा गाण्यामुळे चर्चेत नाही तर चक्क दररोजच्या आंघोळीमुळे चर्चेत आहे. तिने एक ट्विट करुन आपण दररोज आंघोळ करत नसल्याची माहिती दिली.

CAA Protest : ‘ते’ ट्विट आलं फरहान अख्तरच्या अंगाशी, झाली पोलीस तक्रार

लेडी गागा काय म्हणाली ट्विटमध्ये?

मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक प्रयोग, आता येतोय केवळ एकच कलाकार असलेला चित्रपट

“माझ्या सहकाऱ्याने मला प्रश्न विचारला शेवटची अंघोळ तू कधी केली होतीस ते तुला आठवतं का? या प्रश्नावर मला आठवत नाही असं उत्तर मी दिलं” अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या ट्विटवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेकांनी लेडी गागाची खिल्ली उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 5:05 pm

Web Title: lady gaga cant remember when she took a bath last time mppg 94
Next Stories
1 “व्यक्त होणं म्हणजे सामाजिक भान जपणं नाही”
2 ‘या’ अभिनेत्रीच्या आईनेच केली वडिलांची हत्या
3 CAA Protest : ‘ते’ ट्विट आलं फरहान अख्तरच्या अंगाशी, झाली पोलीस तक्रार
Just Now!
X