कॅसी मुसग्रेव्ह, कार्डी बी, लेडी गागा यांच्यासह

लॉस एंजल्स : २०१९ च्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कॅसी मुसग्रेव्ह, कार्डी बी व लेडी गागा या महिला संगीतकारांचा दबदबा राहिला. पुरुष कलाकारांचे वर्चस्व असलेल्या गटातील सर्व ग्रॅमी पुरस्कार या महिलांनी पटकावले आहेत. ग्रॅमी पुरस्कारात महिलांना फारसे महत्त्व दिले जात नाही अशी टीका गेल्या वर्षीच्या पुरस्कार कार्यक्रमात झाली होती. त्याची दखल घेत ध्वनिमुद्रण अकादमीने यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवले. विजेते, सादरकर्ते व यजमान या सर्व पातळ्यांवर महिलांचेच वर्चस्व राहिले.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
vijay devarakonda sold filmfare
“दगडाचा तुकडा घरात…”, विजय देवरकोंडाने पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराचा २५ लाख रुपयांत केलेला लिलाव

अकादमीचे मावळते अध्यक्ष नील पोर्टनाऊ यांच्यावर नव कलाकार विजेत्या दुआ लिपा हिने टीका केली. महिलांनी आपली पायरी उंचावली पाहिजे तरच त्यांना ग्रॅमी पुरस्कारात चांगले स्थान मिळेल, अशी खोचक टीका पोर्टनाऊ यांनी गेल्या वर्षी केली होती. अलिशिया कीज या यजमान होत्या. चौदा वर्षांनंतर हा मान महिलेला मिळाला, त्यांनी माजी प्रथम महिला मिशेल ओबामा, लेडी गागा, जेनीफर लोपेझ व जॅडा पिंकेट स्मिथ यांची नावे पुकारून सर्वाना धक्का दिला.

मिशेल ओबामा यांनी संगीताचे त्यांच्या जीवनातील स्थान महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. संगीतातून आपण एकमेकांना ऐकत असतो. एकमेकांना साद घालत असतो. प्रत्येक आवाजातील एक कहाणी वेगळीच असते. गाण्यातला प्रत्येक स्वर वेगळा असतो. त्यांच्या वक्तव्यावर प्रेक्षकांनी सभागृह डोक्यावर घेतले. मुसग्रेव्ह यांना चार पुरस्कार मिळाले त्यात वर्षांतील अल्बमचा समावेश आहे. त्यांनी ब्रँडी कार्लिली, ड्रेक, ब्लॅक पँथर- द अल्बम, पोस्ट मॅलोन, कार्डी व जॅनेली मोना यांना मागे टाकले. यापूर्वी २०१० मध्ये टेलर स्विफ्ट यांना फीअरलेस या अल्बमसाठी  हा पुरस्कार मिळाला होता. मुसग्रेव्ह यांना उत्कृष्ट देशी अल्बम, उत्कृष्ट देशी गाणे, उत्कृष्ट एकल कामगिरी हे इतर पुरस्कारही मिळाले आहेत. मुसाग्रेव्ह यांनी सांगितले की, गाण्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही. माझ्यासाठी गाणेच सर्वस्व आहे, तरी एवढय़ा विस्तीर्ण पटातील प्रवर्गात पुरस्कार मिळणे हे अविश्वसनीय वाटते आहे.

उत्कृष्ट रॅप अल्बमचा पुरस्कार पटकावून कार्डी ही पहिली महिला एकल विजेती ठरली आहे. इनव्हेजन ऑफ प्रायव्हसी या त्यांच्या अल्बमने निपसी हसल, पुसा टी, ट्रॅव्हीस स्कॉट व दिवंगत मॅक मिलर यांना मागे टाकले. कार्डीला आनंदाश्रू आवरले नाहीत. या अल्बमचे निम्मे काम झाले तेव्हा मी गर्भवती असल्याचे समजले. नंतर आम्ही हा अल्बम पूर्ण केला. अजूनही आम्ही रात्र रात्र जागून काम करतो आहोत. हा पुरस्कार स्वीकारताना श्वास अपुरा पडत आहे. मेंदूच्या नसा ताणल्या गेल्या आहेत. कार्डी ही एकल कामगिरीत हा पुरस्कार मिळवणारी पहिलीच महिला आहे. तिचा पतीही यावेळी उपस्थित होता. अश्रू अनावर होत असताना त्याने तिचे हात धरून तिला सावरले. उत्कृष्ट पॉप अल्बममध्ये लेडी गागा व ब्रॅडले कूपर यांनी मुद्रा उमटवली. हा पुरस्कार त्यांना अ स्टार इज बॉर्न मधील श्ॉलो या गाण्यासाठी मिळाला. दृश्य माध्यमातील ते उत्कृष्ट गाणे ठरले आहे. उत्कृष्ट पॅप कामगिरीत त्याना जोआनी साठी पुरस्काराने गौरवण्यात आले.

लिपाने नृत्य मुद्रण पुरस्कार जिंकल्यानंतर सांगितले की, अनेक मातब्बर महिला कलाकारांसोबत मला नामांकन मिळाले होते. अभिनेता डोनाल्ड ग्रोव्हर याच्या धिस इज अमेरिकाला पहिल्यांदा रॅप गाण्याचा पुरस्कार मिळाला व ती वर्षांतील उत्कृष्ट ध्वनिमुद्रिकाही ठरली. रॅप गायक ड्रेक याने गॉड्स प्लानकरिता मिळालेल्या रॅप गाण्याच्या पुरस्कारासाठी हजेरी लावली. ब्रँडी कार्लिली यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले त्यात उत्कृष्ट अमेरिकी अल्बम बाय द वे आय फर्गिव्ह यू चा समावेश आहे.

अरियाना ग्रांदे या उपस्थित नव्हत्या त्यांना उत्कृष्ट पॉप गायन अल्बमचा पुरस्कार मिळाला आहे. डॉली पार्टन, डायना रॉस यांनी त्यांची कला सादर केली. नऊ वेळा ग्रॅमी मिळालेल्या  मिली सायरस व केटी पेरी यांनी कला सादर केली.

पार्टन यांनी जोलेन, नाइन टू फाइव्ह, हिअर यू कम अगेन या अभिजात कलाकृती सादर केल्या. डायना रॉस यांनी पंचाहत्तरवा वाढदिवस दी बेस्ट इयर्स ऑफ माय लाइफ, रीच आउट अँड टच या हिट कलाकृतीतून साजरा केला.

ग्रॅमी पुरस्कार विजेते

* वर्षांतील अल्बम- गोल्डन अवर- कॅसी मुसग्रेव्हज

* वर्षांतील ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड)- धीस इज अमेरिका, चाइल्डिश गॅम्बिनो

* उत्कृष्ट नव कलाकार- डय़ुआ लिपा

* उत्कृष्ट रॅप अल्बम- इनव्हेजन ऑफ प्रायव्हसी- कार्डी बी

* आर अँड बी अल्बम- एचईआर, एचईआर

* उत्कृष्ट रॅप गाणे- गॉड्स प्लान, ड्रेक

* उत्कृष्ट देशी अल्बमज गोल्डन अवर- कॅसी मुसग्रेव्हज

* वर्षांतील गीत- धीस इज अमेरिका- चाइल्डीश गॅम्बिनो

* उत्कृष्ट पॉप दुहेरी व समूह कामगिरी- श्ॉलो- लेडी गागा व ब्रॅडलेकूपर

* वर्षांतील निर्माता (नॉन क्लासिकल)- फॅरेल विल्यम्स

* उत्कृष्ट रॅप व गायन – धीस इज अमेरिका, चाइल्डीश गॅम्बिनो

* उत्कृष्ट रॅप कामगिरी- किंग इज डेड, केंड्रिक लमार, जे रॉक, फ्युचर अँड जेम्स ब्लेक- बबलिन, अँडर्सन

* उत्कृष्ट रॉक अल्बम-  फ्रॉम दी फायर्स- ग्रेटा व्हॅन फ्लीट

* उत्कृष्ट रॉक गीत- मॅसेडक्शन- सेंट व्हिन्सेंट

* उत्कृष्ट अदाकारी- इलेक्ट्रिक मसिहा, हाय ऑन फायर

* उत्कृष्ट रॉक कामगिरी- व्हेन बॅड गोज गुड- ख्रिस कॉर्नेल

* उत्कृ ष्ट शहरी समकालीन अल्बम- एव्हरीथिंग इज लव्ह- दी कार्टर्स

* उत्कृष्ट आर अँड बी गीत- बूड अप, एला माय

* उत्कृष्ट आर अँड बी पारंपरिक कामगिरी- बेट आरन्ट वर्ष दी हँड, लिऑन ब्रिजेस, हाउ डीप इज युवर लव्ह- पीजे मॉर्टन-येबा

* उत्कृष्ट लॅटिन जॅझ अल्बमज बॅक टू द सनसेट, डॅफनीस प्रिएटो बिग बँड

* उत्कृष्ट विस्तीर्ण जॅझ अल्बम- अमेरिकन ड्रिमर्स- व्हाइसेस ऑफ होप, म्युझिक ऑफ फ्रीडम, जॉन डॅव्हेरसा.

* उत्कृष्ट जॅझ तालवाद्य अल्बम- इमॅनॉन, द वायने शॉर्टर क्वार्टेट

* उत्कृष्ट जॅझ गायन अल्बम- दी विंडो, सेसीली मॅक्लॉरिन साल्व्हंट

* उत्कृष्ट जॅझ एकल- डोन्ट फेन्स मी इन , जॉन डॅव्हेरसा

* उत्कृष्ट रेगी अल्बम- ४४/८७६, स्टिंग अँड श्ॉगी

* उत्कृष्ट नृत्य व इलेक्ट्रॉनिक अल्बम- वुमन वर्ल्डवाइड, जस्टीस

* उत्कृष्ट नृत्य रेकॉर्डिग- इलेक्ट्रिसिटी, सिल्क सिटी, दुआ लिपा (डिप्लो व मार्क रॉन्सन)

* उत्कृष्ट समकालीन अभिजात रचना- केर्निस-व्हायोलिन कॉनसटरे, जेम्स एहनेस, ल्युडोविक, मोलरेट व सियाटल सिंफनी

* उत्कृ ष्ट अभिजात रचना- फुशस- पियाऐन कन्सटरे स्पिरिच्युअ‍ॅलिस्ट, पोएम्स ऑफ लाइफ्स, ग्लॅशियर, रश, जोआन फॅलेटा

* उत्कृष्ट अभिजात एकल गायन अल्बम- साँग्ज ऑफ ऑर्फेअस- मोंटवेर्दी, कॅसिनी, करीम सुलेमान

* उत्कृष्ट तालवाद्य एकल- केर्निस- व्हायोलिन कन्सटरे – जेम्स एहनेस

ठळक मुद्दे

* गायक ख्रिस कॉर्नेल यांना ६१ व्या ग्रॅमी पुरस्कार समारंभात व्हेन बॅड डज गॉड या गाण्यासाठी उत्कृष्ट रॉक गीतासाठी मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* उत्कृष्ट रॅप अल्बमसाठी कार्डी बी पहिल्या एकल महिला मानकरी ठरल्या आहेत.

* क्विन्सी जोन्स यांनी २८ वा ग्रॅमी पुरस्कार मिळवून इतिहास घडवला.

* भारतीय संगीतकार ए. आर. रहमान हे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यास कन्या रहीमा हिच्यासह उपस्थित होते. रहमान यांना स्लम डॉग मिलिनिअर मधील संगीतासाठी २००९ मध्ये दोन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते.

* अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या फेथ- अ जर्नी फॉर ऑल या बोलीशब्दातील अल्बमला दुसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. कार्टर हे अमेरिकेचे ३९ वे अध्यक्ष  होते त्यांना २०१६ मध्ये अ फुल लाइफ- रिफ्लेक्शन्स अ‍ॅट ९० या रचनेसाठी पुरस्कार मिळाला होता.

* अमेरिकेच्या माजी प्रथम महिला मिशेल ओबामा यांची हजेरी लक्षणीय ठरली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संगीताचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.

* चाइल्डिश गॅम्बिनो, केंड्रिक  लमार, अरियाना ग्रांदे, जे झी, केन वेस्ट हे अनुपस्थित होते.