23 November 2017

News Flash

लेडी गागा अभिनय करणार

पॉप स्टार लेडी गागा आता गायनानंतर अभिनय क्षेत्रात उतरण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी ती

लंडन | Updated: January 15, 2013 12:43 PM

पॉप स्टार लेडी गागा आता गायनानंतर अभिनय क्षेत्रात उतरण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी ती अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेत आहे.
डेली स्टार ऑनलाइनच्या वृत्तानुसार, २६ वर्षीय गागा हॉलीवुडमध्ये अभिनय करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. ती जस्टिन टिंबरलेक आणि रिहानासराख्या   संगीतकारांच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छिते, ज्यांनी संगीताच्या क्षेत्रानंतर रूपेरी पडद्यावर यशस्वी पदार्पण केले.
एका सूत्राचे म्हणणे आहे की, लेडी गागाला आता नवीन आव्हान हवे आहे.
तीने पुढील पाच वर्षात ऑस्कर जिकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. गागा मागच्या वर्षी ‘मेन इन ब्लैक ३’ मध्ये कॅम-याच्या समोर दिसली होती. आणि आता तीला प्रमुख भूमिकेत दिसण्याची इच्छा आहे. गागा रॉबर्ट रूड्रीग्वेज दिग्दर्शीत ‘माशेट किल्स’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
गागा ने ट्वीट केलं आहे, ‘‘हो, मी रूड्रीग्वेज च्या माशेट किल्स चित्रपटाद्वारे एका अभिनेत्रीच्या रूपात आपली सुरूवात करणार आहे. मी खूप रोमांचित आहे.

First Published on January 15, 2013 12:43 pm

Web Title: lady gaga plans acting career