01 October 2020

News Flash

तिच्या खांद्यावर दीप-वीरच्या लग्नाची जबाबदारी

दीपिका -रणवीर इटलीतील लेक किमो परिसरात व्हिला दी बाल्बिआनेलो येथे लग्न करणार आहेत.

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग

बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ १४ तारखेला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींपासून ते चाहत्यांपर्यंत साऱ्यामध्ये या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. या लग्नातील प्रत्येक गोष्टी हळूहळू समोर येत असून आता दीप-वीरच्या वेडिंग प्लॅनरचं नावही समोर आलं आहे.

इटलीतील लेक किमो परिसरात व्हिला दी बाल्बिआनेलो येथे लग्न करणाऱ्या या जोडीच्या विवाहसोहळ्याची जबाबदारी प्रसिद्ध सेलिब्रेटी वेडिंग प्लॅनर वंदना मोहन यांनी उचलली आहे. त्यामुळे आता दीप-वीरच्या लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यासाठी वंदना आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे.

 

View this post on Instagram

 

#wdcweddings #lambalhu #wdc #stage#fabulouslighting# installation

A post shared by Vandana Mohan (@vandanamohan_wdc) on

वंदना मोहन या गेल्या २९ वर्षापासून वेडिंग प्लॅनर म्हणून काम करत आहेत. त्यांनी आजवर ५०० हून अधिक लग्नसोहळ्यांचे थाटामाटात आयोजन केले आहे. त्यांच्या बॅकस्टेज प्रोडक्शन प्रा.लि. या कंपनीने आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या लग्नसोहळ्याची धूरा सांभाळली असून त्या देशातील पहिल्या महिला इव्हेंट मॅनेजर ठरल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 1:18 pm

Web Title: lady planning deepika ranveers wedding
Next Stories
1 ‘बाजीगर’ने शाहरुखच्या करिअरची बाजू पलटली
2 Video : ‘कुणी येणार गं’; स्वप्नील- मुक्ताच्या घरी नवा पाहुणा
3 या भारतीय सुपरहिरोचे जनक स्टॅन लीच
Just Now!
X