X
X

‘माझ्या नवऱ्याचं नंदिता दाससोबत अफेअर होतं’; ‘लगान’मधील अभिनेत्यावर पत्नीचा आरोप

READ IN APP

माझे पती, संजय मिश्रांच्या पत्नीसोबतही लिव्ह इनमध्ये होते

कलाविश्वामध्ये ब्रेकअप आणि पॅचअपच्या कायमच चर्चा रंगत असतात. हृतिक रोशन- सुझान, दिया मिर्झा -साहिल संघा या कलाकारांच्या घटस्फोटानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक जोडपं विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. ‘लगान’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता रघुबीर यादव आणि त्यांची पत्नी पूर्णिमा खारगा हे कायदेशीररित्या घटस्फोट घेणार आहे. पूर्णिमा खारगा यांनी रघुबीर यादव यांच्यावर काही आरोप केले आहेत.

माझ्या पतीचे दिग्दर्शिका नंदिता दास यांच्यासोबत अफेअर होतं. तर अभिनेता संजय मिश्रा यांच्या पत्नीसोबतदेखील ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले होते, असा आरोप पूर्णिमा यांनी रघुबीर यादववर केला आहे. त्याच्या या आरोपानंतर संपूर्ण कलाविश्वाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत.

‘स्पॉट बॉय’नुसार, “रघुबीर, संजय मिश्रा यांच्या पत्नी रोशनी अचरेजासोबत लिव्ह इनमध्ये होते. रघुबीर यांनी ही गोष्ट न्यायालयातही मान्य केली आहे. तसंच आमच्या लग्नाला सात वर्ष झाल्यानंतर त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा मला संशय आला. राज भारत या मालिकेत काम करणाऱ्या नंदिता दास या अभिनेत्रीसोबत त्यांचं अफेअर असल्याचं मला समजलं”, असं पूर्णिमा यांनी सांगितलं.

पाहा :  Photos : मृण्मयी देशपांडेची ग्लॅमरस बहीण

 पुढे त्या म्हणतात, नंदिता दाससोबत अफेअर सुरु झाल्यानंतर त्यांनी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. रघुबीरने त्यांच्या आई-वडिलांसोबतही नंदिताची ओळख करुन दिली होती. त्यानंतर नंदितासोबत लग्न करता यावं यासाठी त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे नंदितानेही त्यांच्यापासून फारकत घेतली. नंदिता दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे तिने रघुबीरला सोडलं. त्यानंतर रघुबीर गोरेगावला जेथे राहत होते. तिथेच अभिनेता संजय मिश्रादेखील रहात होते. याचवेळी त्यांचं आणि रोशनीचं सूत जुळलं.

पाहा : बॉलिवूडमधील महागडे १० घटस्फोट; पाहा पोटगी म्हणून कोणी किती रक्कम दिली

 वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयात पूर्णिमाने घटस्फोटासाठी खटला दाखल केला. रघुबीर यादव यांच्याकडून त्यांनी पोटगीची रक्कम म्हणून १० कोटी रुपयांची मागणी केली.

21

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Just Now!
X