‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या जेष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगामुळे त्रस्त होत्या. बंगळुरूमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कमल ठोके यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रसिद्ध मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली होती. या मालिकेत त्या ‘जीजी’ ही व्यक्तिरेखा साकारायच्या. त्या ७४ वर्षांच्या होत्या. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

“जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता ग तुला, मला काय बोललेलीस प्रत्येक ठिकाणी मीच तुझी आज्जी असणारे आणि तूच माझा नातू ,आपल्या दोघांना एकत्र खूप काम करायचं होतं ना मग का ग इतक्यात सोडून गेलीस,” अशा शब्दात अभिनेता नितीश चव्हाण याने दु:ख व्यक्त केलं. नितीशसोबतच शिबानी बावकर हिने “जिजे, जिवणाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहिल गं… भावपुर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात कमल ठोके यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.

“जिजे, छबुडे, कमळे, का? खुप मोठी पोकळी केलीस. RIP” अशा आशयाच कॅप्शन देत अभिनेता किरण गायकवाडने ही आपलं दुख: व्यक्त केलं आहे.

कमल ठोके या मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होत्या. शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली पण त्यांचा ओढा अभिनयाच्या दिशेने होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच त्यांनी ‘बाबा लगीन’, ‘बरड’, ‘माहेरचा आहेर’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आम्ही असू लाडके’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.