07 March 2021

News Flash

‘लागीरं झालं जी’ फेम सुमन काकींची रुपेरी पडद्यावर एण्ट्री

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या 'पळशीची पीटी' या चित्रपटाची कथा 'भागी' नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे.

शिवानी घाटगे

सुमन काकी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ मधली शिवानी घाटगे आता थेट रुपेरी पडद्यावर एण्ट्री करणार आहे. लवकरच सुमन काकी उर्फ शिवानी घाटगे ‘पळशीची पीटी’ या मराठी चित्रपटातून एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित ‘पळशीची पीटी’ या चित्रपटातून शिवानी मुख्याध्यापिका माळी बाईंच्या भूमिकेत दिसणार असून येत्या २३ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाची कथा ‘भागी’ नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटात शिक्षकांची भूमिका किती मौल्यवान असते हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘पळशीची पीटी’मध्ये शिवानी हेच सत्य मुख्याध्यापिका माळी बाईंच्या रुपाने उलगडणार आहे. या भूमिकेविषयी तिला विचारलं असता, ”हा माझा पहिलाच चित्रपट असून दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांची मी आभारी आहे की त्यांनी माझ्यातले कलागुण ओळखले. ‘पळशीची पीटी’ चित्रपटातील मुख्याध्यापिका माळी मॅडम साकारणं माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मालिकेत मी एका समंजस गृहिणीची भूमिका साकारली होती जी प्रथम कुटुंबाचा विचार करते पण मुख्याध्यापिका माळी हे एक करारी व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या हाती संपूर्ण शाळेची आणि उद्याच्या होतकरू युवा पिढीची जबाबदारी आहे. थोडं कठीण होतं पण दिग्दर्शकांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे काम बरंच सोप्पं झालं,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

Video : विठुमाऊलींचा चमत्कारिक ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलात का?

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजला गेलेल्या ‘पळशीची पीटी’मध्ये शिवानी सोबतच अॅथलेट ‘भागी’च्या प्रमुख भूमिकेत किरण ढाणे आणि राहुल मगदूम झळकणार आहे. शिवाय काही कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यात असून लवकरच त्यांची नावे रसिकांसमोर येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 6:47 pm

Web Title: lagir zala ji fame shivani ghatage upcoming marathi movie palshichi piti ssv 92
Next Stories
1 Video : विठुमाऊलींचा चमत्कारिक ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलात का?
2 बिकाऊ, देशद्रोही पत्रकारांनी मला बॅन करावंच – कंगना रणौत
3 ‘फोर्ब्स’च्या सर्वाधिक कमाईच्या यादीत भारतातला एकमेव अक्षय कुमार
Just Now!
X