28 September 2020

News Flash

लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित

लहुजी वस्ताद स्वातंत्र्यसंग्रामाचे उद्गाते

“छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे उद्गाते आहेत. त्यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्यासह इतर अनेक महापुरुषांना घडवणाऱ्या लहुजी साळवे यांच्या चित्रपटासाठी प्रत्येकाने लोकवर्गणी द्यायला हवी. त्यांचे कार्य समजून घेऊन समाजापर्यंत आपला इतिहास पोहोचवला पाहिजे,” असे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे समन्वयक आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. शिवाजी दळणर यांनी केले.

आलवसा फाउंडेशन व ऐसपैस निर्मिती यांच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या टीजर व पोस्टरचे लोकार्पण रविवारी झाले. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात रंगलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, मध्यप्रदेशातील राज्यमंत्री कृष्णचंद्र ठाकुर (सीसोदिया), नऱ्हे येथील जाधवर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. सुधाकरराव जाधवर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभिनेते गिरीश परदेशी, नगरसेविका स्वाती लोखंडे, लहुजी वस्ताद स्मारकाचे अशोक लोखंडे, आलवसा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर भडकवाड व ऐसपैस निर्मितीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव शिरोळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रा. शिवाजी दळणर म्हणाले, “ज्या लहुजी साळवे यांनी क्रांतीची ज्योत पेटवून पुण्यात अनेक क्रांतिकारक घडवले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना सरंक्षण देऊन शिक्षण प्रसार सोयीचा केला. त्यांच्यामुळेच आज मुली शिकताहेत, हे आपण विसरता कामा नये. त्यांच्यावरील चित्रपट समाजाने बनवावा. प्रत्येकाने यामध्ये योगदान द्यावे. अधिकाधिक लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.”

 

शंकर भडकवाड प्रास्ताविकात म्हणाले, लहूजी वस्ताद यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्यावरील हा चित्रपट तयार केला जात आहे. पुढील वर्षी लहुजी वस्ताद यांच्या जयंतीदिनी (१४ नोव्हेंबर २०१९) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. कलादिग्दर्शक संतोष संकर, अशोक लोखंडे यांनी मनोगते व्यक्त केली. सोमनाथ देवकाते यांनी प्रास्ताविक केले. दत्ता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 5:18 pm

Web Title: lahuji vasatad movie poster
Next Stories
1 Detective Pikachu Trailer : पिकाचू झाला हेर !
2 …म्हणून बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन
3 ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेत ‘राधा’ पर्वाची सुरुवात
Just Now!
X