28 February 2021

News Flash

Video : …म्हणून ‘शिकारा’ पाहताना लालकृष्ण अडवाणी झाले भावूक

पाहा, नेमकं काय झालं तेव्हा

काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित ‘शिकारा : द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक आणि समिक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच दुसरीकडे मात्र, भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट दिग्दर्शक-निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

नुकतंच या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी लालकृष्ण अडवाणीदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे हा चित्रपट पाहत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी काश्मिरी पंडितांसोबत जे झालं ते पाहून त्यांना अश्रु अनावर झाल्याचं सांगण्यात येत आहे. “लालकृष्ण अडवाणी यांनी शिकारा पाहिला. चित्रपटावर तुम्ही केलेलं प्रेम आणि दिलेले आशिर्वाद यासाठी मनापासून आभारी आहे”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं.


दरम्यान, १९ जानेवारी १९९० हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. कारण त्या दिवशी काश्मिरी पंडितांना खोरं सोडून बाहेर जावं लागलं आणि आपल्याच देशात शरणार्थी होऊन जगावं लागलं. काश्मिरी पंडितांवर झालेला हाच अत्याचार ‘शिकारा : द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदिल खान आणि सादिया या दोघांनी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 9:09 am

Web Title: lal krishna advani gets emotional after watch vidhu vinod chopras film shikara ssj 93
Next Stories
1 Oscars 2020 : ‘ऑस्कर’ पुरस्कार कधी, कुठे आणि केव्हा बघता येईल?
2 अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
3 श्वेता तिवारीच्या लेकीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X