कविता लिहणारा कवी आणि गाणे लिहणारा गीतकार या दोघांमधील श्रेष्ठत्वाची लढाई गेली अनेक दशके आपण साहित्य क्षेत्रात पाहात आहोत. वास्तविक कविता आणि गाणे या दोघांचाही निर्मितीसाठी तेवढीच कल्पनाशक्ती खर्च करावी लागते. शिवाय गाण्यामधील संगीत वगळले किंवा कवितेत संगीताचा वापर केला तर दोघांमधील फरक शोधणे कठीण होउन बसेल. असाच काहीसा श्रेष्ठत्वाचा वाद सध्या अभिनय श्रेत्रातही पाहायला मिळत आहे. सिनेमात काम करणारा कलाकार मोठा की मालिकेत काम करणारा हा वाद अभिनेत्री ‘लाला केंट’ व ‘जेनिफर लॉरेन्स’ यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा उफाळुन बाहेर आला आहे. वास्तविक सिनेमा व मालिका हे दोन्ही दृष्यमाध्यमांचे प्रमुख घटक आहेत. शिवाय दोघांचाही मुळ उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करणे होय. या दोन्ही क्षेत्रांसाठी लागणारे कर्तृत्व सारख्याच दर्जाचे आहे. परंतु तरीही मोठ्या व लहान पडद्यावरील कलाकारांमध्ये ही श्रेष्ठत्वाची लढाई सातत्याने सुरु असते.

जेनिफर लॉरेन्सने लाला केंटला सी ग्रेड अभिनेत्रीचा दर्जा देउन एका नविन वादाची सुरुवात केली आहे. लाला सारख्या एखाद्या टिव्ही कलाराने चित्रपटात काम केले तर त्या चित्रपटाच्या दर्जावरच संशय घ्यावा लागेल. असे वादग्रस्त वक्तव्य तीने केले. परंतु ही टिका केंटला चांगलीच झोंबली आणि तीने थेट जेनिफरच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवली.

या वादाची सुरवात जेनिफरने दिलेल्या एका मुलाखतीतुन झाली. यात तीला मालिकेत काम करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना मालिकांमध्ये केल्या जाणाऱ्या अभिनयावरच तीने प्रश्न उपस्थित केले. शिवाय ‘व्हँडरपंप रुल्स’ या मालिकेचा दाखला देत त्यातील मुख्य अभिनेत्री लाला केंटवरही टिकास्त्र सोडले. यानंतर एका पत्रकार परिषदेतुन लालाने देखिल जेनिफरच्या अभिनयाची खिल्ली उडवली. हा वाद प्रतिवादांचा खेळ दिवसागणीक वाढत गेला. आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात याचा भडका उडाला. कार्यक्रमात जेनिफरने मद्यधुंद अवस्थेत लाला केंट सकट अनेकांना यथेच्च शिव्या घातल्या होत्या. दुदैवाने लाला तेथेच हजर होती. संपुर्ण सिनेसृष्टीसमोर स्वत:चा झालेला अपमान तीला सहन झाला नाही. आणि लगेचच ट्विटरच्या माध्यमातुन तीने आपला राग व्यक्त केला. तसेच त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत जेनिफर लॉरेन्स एक मानसिक रुग्ण आहे. ती अंमली पदार्थांचे व्यसन करते. तसेच केवळ पैसे आणि प्रसिद्धीसाठी तीने ‘जॉनी डेप’, ‘लिओनार्दो दी कॅप्रिओ’, ‘टॉम क्रूज’ सारख्या अनेक मोठ्या अभिनेत्याबरोबर संबंध ठेवले होते. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खालावताच तीने त्यांना सोडुन दिले. यांसारखे अनेक गंभीर आरोप लाला केंटने जेनिफरवर केले आहेत. हा वाद प्रतिवादांचा खेळ दिवसागणीक आणखीनच वाढत चालला आहे. त्यामुळे छोट्या व मोठ्या पडद्यामधील ही श्रेष्ठत्वाची लढाई आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.