03 March 2021

News Flash

ललित आणि सईची ‘कलरफुल’ लव्हस्टोरी

करण आणि मीरा अशी या पात्रांची नावं असून या दोघांची ही कथा आहे.

लॉकडाउननंतर चित्रपटगृहे आता उघडली जात असताना अनेक नवनवीन चित्रपटाची घोषणा या काळात होत आहे. प्रयोगशील आणि गुणी म्हणून ज्यांची दखल संपूर्ण चित्रपटसृष्टीने घेतली आहे असा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी ‘कलरफुल’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून केली.

नवनवीन आणि साध्या विषयांवर प्रतिभावन कलाकृतीला घडवणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे ‘कलरफुल’ हा रंगांनी भरलेला चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या पोस्टरमध्ये एक जोडपं निसर्गरम्य वातावरणात बसलेले दिसत आहेत. करण आणि मीरा अशी या पात्रांची नावं असून या दोघांची ही कथा आहे. ‘कलरफुल’च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असून या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.

पाहा फोटो : या निसर्गरम्य ठिकाणी होतंय ‘आई माझी काळुबाई’ मालिकेचं शूटिंग

चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडी विषयी सांगतो, “ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचं काम मी पाहिलं आणि अनुभवलं सुद्धा आहे. ‘करण मीरा’ हे दोघेच साकारू शकतील याबाबत मी ठाम होतो. सई आणि ललित या दोघांची पात्रं जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 11:52 am

Web Title: lalit prabhakar and sai tamhankar new movie colorful ssv 92
Next Stories
1 भारतीय देवतांना कॉपी करणं कार्डीला पडलं भारी; ‘त्या’ फोटोशूटमुळे मागावी लागली माफी
2 नागा साधूंना अटक झाली पाहिजे म्हणणाऱ्या पूजा बेदीला कुंभमेळ्याचं आमंत्रण
3 अविका गौरने दिली प्रेमाची कबुली; करते ‘या’ व्यक्तीला डेट
Just Now!
X