News Flash

‘ललित २०५’ मालिकेत संक्रांतीचं अनोखं सेलिब्रेशन

भैरवीची ही पहिली मकरसंक्रांत आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ललित २०५ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच आता भैरवीची पहिली मकरसंक्रांत असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात जल्लोषाचं वातावरण पसरलं आहे. या सणाचं मांगल्य आणि पावित्र्य जपण्यासोबतच हा दिवस खास करण्यासाठी या कुटुंबियाने नवी योजना आखली आहे.

संक्रांतीला हळदीकुंकू आणि वाण लुटण्याची प्रथा आहे. यावेळी अनेक महिला वेगवेगळ्या वस्तू वाण म्हणून लूटतात. मात्र भैरवीने पर्यावरणपूरक पद्दतीने यंदाची मकरसंक्रांत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टीक किंवा अन्य कोणतीही वस्तू देण्यापेक्षा भैरवीने तुळशीचं लहानसं रोपटं वाण म्हणून देण्याचं ठरवलं आहे.

‘मराठी संस्कृतीत सणावारांना विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने केली जाणारी व्रतवैकल्य आपल्याला निसर्गाशी जोडत असतात. हेच महत्व लक्षात घेऊन तुळशीचं रोप देण्याची अनोखी संकल्पना आम्हाला सुचली आणि आम्ही ती अंमलात आणली’, अशी भावना भैरवी म्हणजेच अमृता पवारने व्यक्त केली आहे. दरम्यान, हा भाग १५ जानेवारीला प्रसारित होणार आहे. त्यामुळे रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर हा भाग पहायला विसरु नका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 2:21 pm

Web Title: lalit205 marathi serial bhairavis first makarsankrant
Next Stories
1 #GullyBoy : रणवीर म्हणतोय, ‘अपना टाईम आएगा’
2 Photo : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची
3 शाल्मली म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’
Just Now!
X