News Flash

लारा दत्ताचा ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतला ‘हा’ रेकॉर्ड 20 वर्षांनंतरही मोडणं अशक्य

2000 साली लारानं मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता.

अभिनेत्री लारा दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ता हिनं वीस वर्षांपूर्वी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. याच सौंदर्य स्पर्धेत प्रियांका चोप्रानं ‘मिस वर्ल्ड’ तर दिया मिर्झानं ‘मिस एशिया पॅसिफिक’ हा किताब पटकावून नवा विक्रम रचला. मात्र या स्पर्धेत लारा दत्तानं रचलेला विक्रम २० वर्षांनंतरही एकाही सौंदर्यवतीला मोडता आला नाही.

सौंदर्यस्पर्धेतील विविध फेरीत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम लारा दत्तानं रचला आहे. तिनं ९.९९ असे सर्वाधिक गुण परीक्षकांकडून मिळवले होते. स्विमसूट फेरीत आणि अंतिम फेरीत तिनं सर्वाधिक गुण मिळवत मिस युनिव्हर्स स्पर्धेत नवा इतिहास रचला.  २० वर्षे उलटली तरी हा रेकॉर्ड कोणत्याही सौंदर्यवतीला मोडता आला नाही. २००० मध्ये तिनं ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीय सौंदर्यवतीला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकता आला नाही.

२००० मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर लाराने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. ‘अंदाज’ हा तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी लाराने सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. ‘अंदाज’नंतर लारा दत्ताने अनेक सिनेमे केले, त्यापैकी काही सिनेमा हिट ठरले. लाराच्या हिट सिनेमांमध्ये ‘मस्ती’, ‘नो एण्ट्री’, ‘पार्टनर’, ‘हाऊसफूल’, ‘ब्लू’सह आणखी काही सिनेमांचा समावेश आहे.

लाराने २०११ मध्ये टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगी असून तिचं नाव सायरा आहे. महेश भूपती आणि लारा यांची भेट महेशच्या एंटरटेन्मेंट आणि स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीच्या एका बिझनेस मीटींगमध्ये झाली. लाराने तिच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचं काम महेशच्या कंपनीला दिलं होतं. या भेटीनंतर लारा आणि महेश डेट करू लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 9:25 am

Web Title: lara dutta miss universe record stands unbroken ssv 92
Next Stories
1 खरा चार्ली कोणता?; पडद्यावरचा की पडद्यामागचा?
2 …म्हणून अक्षय ‘हेरा फेरी’मध्ये घालायचा भोकं पडलेली बनियान: सुनिल शेट्टी
3 एकवेळ कर्ज घेईन पण माझ्या कामगारांना पगार देईन, अभिनेत्याचा खुलासा
Just Now!
X