News Flash

महेश भुपतीच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत लारा म्हणाली…

महेश भुपतीचा काल वाढदिवस होता. महेशचा वाढदिवस साजरा करतानाचा हा फोटो लाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत लाराने महेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Credit : Lara Dutta Instagram)

‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ता ही बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्का राहते. लाराने नुकाताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो लाराने पती आणि टेनिसपटू महेश भूपतीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.

लाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लाराचा पती महेश, त्याची मुलगी आणि काही नातेवाईक दिसतं आहेत. हे सगळे महेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आल्याचे दिसतं आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महेश! तुला सगळ्यात जास्त आवडण्याऱ्या गोष्टी तुझ्यासोबत आहेत,” अशा आशयाचे कॅप्शन लाराने तो फोटो शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

लाराने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी महेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक करण जोहर कमेंट करत म्हणाला, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महेश.” तर अभिनेता प्रतीक बब्बर म्हणाला, “चॅम्पला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, अशा कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी महेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : आई कुठे काय करते : अनिरुद्ध घेणार अरुंधतीसोबत घटस्फोट?

महेश आणि लारा यांनी ऑगस्ट २०११ मध्ये लग्न केलं. तर जानेवारी २०१२ला त्यांची मुलगी सायराचा जन्म झाला. लारा आणि महेश यांचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. ज्याचं नाव हे ‘बीग डॅडी प्रोडक्शन’ आहे.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

दरम्यान, लारा या आधी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये लाराने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या आगामी चित्रपटात लारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि आदिल हुसेन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 9:55 am

Web Title: lara dutta shares a peek into husband mahesh bhupathi s birthday celebrations cake and your girls dcp 98
Next Stories
1 तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या ‘हसीन दिलरुबा’चा टीझर रिलीज; 2 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर होणार स्ट्रीम
2 अपडेट: अर्जुन कपूरची बहिण अंशुलाला रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
3 आई कुठे काय करते : अनिरुद्ध घेणार अरुंधतीसोबत घटस्फोट?
Just Now!
X