News Flash

VIDEO : अनिल कपूरही विचारत आहेत, ‘मेरे अच्छे दिन कब आयेंगे’?

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ बराच चर्चेत आला आहे.

फन्ने खान, FANNEY KHAN

ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर, राजकुमार राव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘फन्ने खान’ या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमागोमाग हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. त्यासोबतच अनिल कपूर यांच्या चित्रपटाच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

‘मेरे अच्छे दिन कब आयेंगे’, असे बोल असणाऱ्या या गाण्यात अनिल कपूर झळकत असून, चित्रपटातील त्यांची भूमिका ही अत्यंत प्रभावी वाटत आहे. या चित्रपटातून ते एका टॅक्सी चालकाच्या भूमिकेत झळकत असून, कधीही न पाहिलेल्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

अमित त्रिवेदीच्या आवाजातील या गाण्यात अच्छे दिन, ही संकल्पना अतिशय सुरेखपणे वापरण्यात आली असून, ती तितक्याच प्रत्ययकारीपणे मांडण्यात आली आहे.

BLOG: ‘होय मी हिंदू आहे’ का म्हणाले राहुल गांधी?

७३व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन प्राप्त ‘एव्हरीबडीज फेमस’ या बेल्जियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. पालकांच्या इच्छेखातर संगीत क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा प्रवास या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन आणि राजकुमार राव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऐश्वर्या यात संगीत क्षेत्रातील एका लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकरनं केलं आहे. ३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 7:09 pm

Web Title: lata mangeshkar achche din video song fanney khan actor anil kapoor aishwarya rai watch video
Next Stories
1 अतुल कुलकर्णीची मल्याळम ‘जर्नी’ प्रेक्षकांच्या भेटीला
2 Video : कोण ठरणार ‘बिग बॉस मराठी’चा विजेता, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
3 Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीमुळे ‘त्यांची’च चर्चा
Just Now!
X