News Flash

“…आणि मी शब्दहीन झाले”; लतादिदींनी पोस्ट केला ऋषी कपूर यांचा दुर्मिळ फोटो

लता मंगेशकर 'तो' फोटो पाहून शब्दहीन झाल्या.

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्विट करुन ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे फोटो अवश्य पाहा – ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट ते कलर… कधीही न पाहिलेले ऋषी कपूर!

लतादिदींनी ऋषी कपूर यांच्या बालपणीचा एक दुर्मिळ फोटो ट्विट केला आहे. “काही दिवसांपूर्वी ऋषीजी तुम्ही हा फोटो मला पाठवला होता. हा फोटो पाहून तो काळ आठवला. या फोटोमध्ये तुम्हाला पाहून मी शब्दहीन झाले आहे.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. लतादिदींनी ट्विट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचकपसंती – “…म्हणून ऋषी कपूर यांना भेटायला रुग्णालयात गेलो नाही”; बिग बींनी केला खुलासा

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 3:53 pm

Web Title: lata mangeshkar shares a rare photo of rishi kapoor mppg 94
Next Stories
1 ऋषी कपूर- इरफान खाननंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रोड्यूसर्स गिल्डच्या CEOचे निधन
2 “करोनामुळे गमावले कुटुंबातील दोन सदस्य”; अभिनेत्याने केला खुलासा
3 “उद्धव ठाकरेंचे ते शब्द ऐकून समाधान वाटले”, लतादीदींनी व्यक्त केल्या भावना
Just Now!
X