यावर्षीपासून सुरु होत असलेला यश चोप्रा स्मृती पुरस्कार गायिका लता मंगेशकर यांना देण्यात येणार आहे. दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्यावसायिक-राजकीय नेता टी सुब्बारामी रेड्डी हे ‘यश चोप्रा स्मृती पुरस्कार’ सुरु करत आहेत.
रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तिंना देण्यात येणार आहे. काँग्रेस नेता रेड्डी म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या चित्रपटसृष्टीतील अफाट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. लताजी आणि यश चोप्रांचे खूप चांगले संबंध होते. त्याचप्रमाणे, चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. यश चोप्रा हे प्रतिभावान दिग्दर्शक होते, असेही ते म्हणाले.
यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ ला निधन झाले. त्यामुळे दरवर्षी याच दिवशी हा पुरस्कार सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे. हेमा मालिनी, सिमी गरेवाल आणि अनिल कपूर यांनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.