भारतीय संगीतक्षेत्रात लता मंगेशकर यांचं योगदान मोठं आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात लतादीदींनी आपल्या समुधूर आवाजाने अनेक गाणी अजरामर केली. हिंदी, मराठी यांच्यासह अनेक भाषांमध्ये लतादीदींनी गाणी गायली आहेत. जुन्या काळ्यातील अनेक दिग्गज अभिनेत्रींना लतादीदींनी आपला आवाज दिला आहे. सध्या वाढत्या वयामुळे, त्यांनी रेकॉर्डींग करणं थांबवलं आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमी आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतात.
सोमवारी लतादीदींनी आपला लाडका कुत्रा, बिट्टूचा फोटो ट्विटर अकाऊंटवर टाकत, त्याला पाचव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Namaskar. Aaj hamare Bittu ka 5va janamdin hai. Happy Birthday Bittu. pic.twitter.com/PF13T0VUyI
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) February 3, 2020
नेटकऱ्यांनीही लतादीदींच्या या पोस्टला आपली पसंती दर्शवत, बिट्टूचं अभिनंदन केलं आहे.
Lata di di aap Kay bittu ku janamdin Mubarak ho
— M a Babu jai hind jai Karnataka (@MaBabu19) February 3, 2020
Happy Birthday Bittu
— Shovon#TeamShreya (@SGianShovon) February 3, 2020
Happy Birthday Bittu
— Chanchal Bhardwaj (@chanx5268) February 3, 2020
याव्यतिरीक्त लतादीदी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर व्यक्त होत असतात. मध्यंतरी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं, मात्र आजारपणावरही मात करत लतादीदी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 3, 2020 1:00 pm