News Flash

दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

काही दिवसांपूर्वी मेघनाच्या डोहाळे जेवणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या

दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी अभिनेत्री मेघना राज आई झाली आहे. तिने गुरुवारी एका मुलाला जन्म दिला आहे. चिरंजीवीच्या कुटुंबीयांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच या नव्या पाहुण्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेता चिरंजीवी सरजाच्या निधनानंतर त्याचा भाऊ ध्रुवने सोशल मीडिया पोस्टद्वारे मेघना आई होणार असल्याचे सांगितले होते. चिरंजीवीच्या निधनाचे दु:ख तर होतेच, पण दुसरीकडे घरात नवा सदस्य येणार म्हणून उत्साह देखील होता. चिरंजीवीच्या बाळाचे आगमन होणार असल्यामुळे त्याच्या घरातले सारे दु:ख पचवून या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. आज अखेर त्यांच्या घरात नवा पाहुण्याचे आगमन झाले आहे. मेघनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Junior chiru is comming

A post shared by DS_BOSS (@_action_prince_fc) on

चिरंजीवीचा चुलत भाऊ सुरजने सोशल मीडियावर या लहान बाळाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चिरंजीवीच्या फोटोच्या जवळ चिमुकल्याचा फोटो काढला असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मेघनाच्या डोहाळे जेवणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा मेघनाच्या खूर्चीच्या बाजूला चिरंजीवीचे मोठे कटआऊट लावण्यात आल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो पाहून चिरंजीवी तेथेच उभा असल्यासारखे भासत होते. चिरंजीवी आपल्यात नसला तरीही तो मेघनाला आताही साथ देत आहे, हेच या क्षणाचा फोटो पाहून लक्षात येत होते.

७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवीचे निधन झाले. बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 5:30 pm

Web Title: late actor chiranjeevi sarja wife actress meghna raj gives birth to baby boy avb 95
Next Stories
1 ‘या’ शहरांत ‘मिर्झापूर २’च्या कलाकारांचे भव्य कटआऊट्स
2 रिलेशनशिप स्टेटसबद्दल कियारा म्हणते, “लग्न होईपर्यंत मी…”
3 ‘मुद्दा लोकांना हसवण्याचा नाही…’, मुकेश खन्नांनी दिले कपिल शर्माला उत्तर
Just Now!
X