News Flash

Video: दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?

व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजाचे ७ जून २०२० रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ३९व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी चिरंजीवीची पत्नी मेघना राज गरोदर असल्याचे समोर आले होते. ऑक्टोबर महिन्यात मेघनाने बाळाला जन्म दिला. आता मेघनाने तिच्या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ज्युनिअर चिरंजीवीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj)

आणखी वाचा : मृत्यूनंतरही पत्नीच्या डोहाळे जेवणाला उपस्थिती, फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘आमच्या छोट्या राजकुमाराशी ओळख करुन देते’ या आशयाचे कॅप्शन मेघनाने दिले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तो सेम चिरंजीवीसारखा दिसतो असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मेघनाच्या डोहाळे जेवणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा मेघनाच्या खूर्चीच्या बाजूला चिरंजीवीचे मोठे कटआऊट लावण्यात आल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो पाहून चिरंजीवी तेथेच उभा असल्यासारखे भासत होते. चिरंजीवी आपल्यात नसला तरीही तो मेघनाला आताही साथ देत आहे, हेच या क्षणाचा फोटो पाहून लक्षात येत होते.

चिरंजीवी आणि मेघना हे चांगले मित्र-मैत्रीण होते. ते जवळापास १० वर्षे एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या मैत्रीच्या नात्याचे हळहळू नात्यात रुपांतर झाले. २०१८मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले होते. मेघना ही सुद्धा एक अभिनेत्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 3:42 pm

Web Title: late actor chiranjeevi sarjas baby boy video share by meghna raj avb 95
Next Stories
1 प्रभास करतोय पूजा हेगडेशी फ्लर्ट, ‘राधे श्याम’चा टीझर प्रदर्शित
2 रणबीर कपूरने ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी पार्क केली अन्…
3 ‘आम्ही प्रेमात पडलो अन्…’, जाणून घ्या ‘शनाया’ची लव्हस्टोरी
Just Now!
X