बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार होता. आज या पुतळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. मेणाच्या श्रीदेवींना पाहण्यासाठी चाहते अतुर होते. आज अखेर या पुतळ्यावरील पडदा उचलण्यात आला आहे. या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर, दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी उपस्थित होत्या. दरम्यान बोनी कपूर यांचे भाऊ संजय कपूर आणि श्रीदेवी यांची खास मैत्रीण देखील तेथे उपस्थित होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवींचा मेणाचा पुतळा तयार करण्यासाठी २० तज्ज्ञांना बोलवण्यात आले होते. हा पुतळा बनण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. त्यांचा आउटफिट तयार करणे सर्वात जास्त आव्हानात्मक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान श्रीदेवी यांचे क्राउन, कफ्स, ईयरिंग्स आणि ड्रेसच्या 3D प्रिंटच्या अनेक टेस्ट घेण्यात आल्या होत्या.
Boney Kapoor along with daughters Janhvi and Khushi unveil the wax statue of #Sridevi at Madame Tussauds #Singapore. pic.twitter.com/w64fQBvUbz
— taran adarsh (@taran_adarsh) September 4, 2019
श्रीदेवींच्या वाढदिवसाच्या दिवशी १३ ऑगस्ट रोजी मेणाचा पु्तळा तयार करणार असल्याची घोषणा केली होती. मेणाच्या श्रीदेवींना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता हा मेणाचा पुतळा सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान श्रीदेवींच्या पुतळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खानसारख्या दिग्गज कलाकारांचे पुतळे आहेत. तसेच अभिनेत्री अनुष्का शर्मा, शाहिद कपूर, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण, देसी गर्ल प्रियांका चोप्राचा देखील मेणाचा पुतळा या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. २३ देशांमध्ये मादाम तुसॉं संग्रहालये आहेत. सर्वात पहिले संग्रहालय हे १८३५ साली लंडनमधील बेकर स्ट्रीट येथे तयार करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 1:03 pm